राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 24 जुलै : शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या आमदारांपाठोपाठ खासदारांवर कारवाईच सुरूच आहे. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव (prataprao jadhav) यांची शिवसेना (shivsena) जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यासह एक जिल्हा प्रमुख, 2 उपजिल्हा प्रमुख आणि 3 तालुका प्रमुखांनाही पक्षातून काढून टाकले आहे. शिवसेनेमध्ये आमदारांना फोडून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. पण, आता खासदार सुद्धा शिंदेंच्या गळाला लागले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील 2 आमदारांच्या पाठोपाठ शिवसेना खासदार प्रतापराव जाधव हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे जाधव यांच्यावर धडक कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे, असं शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मधून जाहीर करण्यात आले आहेत. ( VIDEO:आई-वडील प्रवास करत होते त्याच विमानाचा पायलट होता मुलगा; अचानक भेटले अन्.. ) प्रतापराव जाधव हे शिंदे गटात सामील झाल्याने पक्ष विरोधी कारवाया करत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यावरून ही हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रताप जाधवांवर कारवाई का? राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मुंबईत गेलेल्या शिंदे गटांच्या ४० आमदारांची मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली होती. या बैठकीत दिल्लीहून सेनेचे 12 खासदार ऑनलाईन उपस्थित होते. विशेष म्हणजे, त्यात बुलडाण्याचे सेना खासदार प्रतापराव जाधव यांचा समावेश होता. एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात 11 खासदार होते. पण, दोन तृतीयांश आकडा गाठण्यासाठी एका खासदाराची गरज होती. त्यानंतर कोल्हापूरचे दोन्ही शिवसेनेचे खासदार शिंदे गटात यायला तयार झाले. त्यानंतर आयोजित बैठकीला 12 खासदार हजर होते. त्यामुळे प्रताप जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.