सातारा, 09 एप्रिल: एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या एक गटानं आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP president Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक ( Silver Oak) येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. आंदोलक कर्मचाऱ्यांनी पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक आणि दगड फेक केली. या प्रकरणी 105 आंदोलकांविरोधात कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या हिंसक आंदोलनावर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (MP Chhatrapati Udayan Raje Bhosale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देत असताना त्यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली आहे.
शरद पवार यांच्या घराबाहेर केलेल्या हिंसक आंदोलनाचं छत्रपती उदयनराजे भोसले यांनी समर्थन केलं आहे. तसंच त्यांना शरद पवारांना टोलाही लगावला आहे. बरोबर झालंच पाहिजे, करायलाच पाहिजे, अजून दगडं मारायला पाहिजे. फार छोटा विचार झाला, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनी या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
कर्म असतं ना कर्म... जे आपण जन्म करतो... प्रत्येक जणाला लागू होतं, तुम्हाला आणि सगळ्यांना लागू होतं... यातून कोण वाचत नाही. जे आपण या जन्मी करतो, ते ह्याच जन्मी आपल्याला कुठल्याना कुठल्या पद्धतीने फेडावं लागतं. अजून काय बोलणार, असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांवर टीका केली.
ST कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला असून 104 कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि चौकशीनंतर अटकेची कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जमावाला भडकवणे, कट रचणे या गुन्ह्या अंतर्गत वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीनंतर पोलिसांनी सदावर्ते यांना अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sharad Pawar, Udyanraje Bhosle