मुंबई, 18 जून: मागील तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार (Rain in Maharashtra) पावसाची नोंद झाली आहे. 5 जून रोजी महाराष्ट्रात मान्सून (Monsoon) दाखल झाल्यापासून अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना तर मान्सूननं पार झोडपून काढलं आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. दरम्यानच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं मत हवामान तज्ज्ञांनी मांडलं आहे.
भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक के एस होसाळीकर यांनी नुकतंच पुढारीशी संवाद साधला आहे. यामुळे त्यांनी मान्सून पावसात झालेल्या अनेक बदलांवर प्रकाश टाकला आहे. तसेच राज्यात अतिवृष्टीचं प्रमाण का वाढलं आहे? याचंही उत्तर त्यांनी दिलं आहे. खरंतर, सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मागील तीन दिवस मुंबईसह ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये मुसळधार पाऊस झाला. तर काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली. तर काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकणात अतिवृष्टी झाल्याची माहितीही होसाळीकर यांनी दिली आहे.
हेही वाचा-Mumbai Unlock: मुंबईचा 'या' स्तरात समावेश, जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी
दरवर्षीचा मान्सून हा आधीच्या मान्सूनपेक्षा काहीतरी वेगळा असतो. त्यामध्ये अनेक छोटे-मोठे बदल झालेले असतात. दरवर्षी जूनमध्ये इतका जास्त पाऊस होतं नाही. मात्र यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील पावसाच्या संतुलनाबाबत माहिती देताना होसाळीकर यांनी सांगितलं की, अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात काही बदल झाले की राज्यात पाऊस पडतो. अरबी समुद्रातील शाखा सक्रिय झाली की, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पाऊस पडतो. तर बंगालच्या उपसागरातील शाखा सक्रिय झाली की विदर्भात पाऊस पडतो. अरबी समुद्रात पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याची तीव्रता, वेग वाढली की आद्रता वाढते. त्यामुळे मान्सून सक्रिय होतो.
हेही वाचा-राज्यात कसा असेल आज दिवसभर पाऊस, जाणून घ्या सविस्तर
सध्या राज्यात सध्या अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. पण अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. अतिवृष्टी होण्यामागं मुख्य कारण म्हणजे हवामानात होणारे तीव्र बदल. पण अतिवृष्टी होण्याचं आणि हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस कमी पडण्याचं प्रमाण कमी का होत आहे ? हा बदल नेमका कशामुळे? यावर बारकाईनं अभ्यास सुरू आहे, अशी माहितीही होसाळीकर यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Monsoon, Mumbai rain