मुंबई, 04 जुलै: देशात मान्सूनचं (Monsoon) आगमन होऊन काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मात्र पूर्ण देशात मान्सून पोहोचण्याआधीच त्याच्या प्रवासात खंड (Break) पडल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. मान्सूनचा प्रवास अर्ध्या वाटेतच थांबला असून ही शेतकऱ्यांसाठी (Farmers) आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी (Economy) चांगली घटना नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. मागील तीन आठवड्यापासून राज्यात मान्सून रुसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट गडद होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी हवामान खात्यानं देशात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सूननं दिमाखात आगमन केलं. त्यानंतर मात्र पावसानं संपूर्ण देशात ब्रेक घेतला आहे. दरम्यानच्या काळात देशातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलं आहे. देशात 7 जुलैपर्यंत मान्सूनची हीच स्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
Possibilities of TS 🌩 over S Konkan, adjoining S M Mah and at isol places interior, as shown below in next 2,3 hrs as per the latest satellite obs at 1.30 pm 4th July.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 4, 2021
Please see IMD updates. pic.twitter.com/muzT42zOPt
7 जुलैनंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर देशात मान्सूनची जोरदार वापसी होण्याची शक्यता आहे. आज सकाळपासून दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील 2 ते 3 तासांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. बाकी सर्वत्र राज्यात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे.
4 Jul, Severe weather warning issued by IMD for Maharashtra today for coming 5 days indicate D4, D5; 7 & 8 July, there is possibilities of enhanced 🌩🌩thunderstorm activities at many places especially int. This could be associated with mod rains too🌧.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 4, 2021
Watch for IMD updates then pic.twitter.com/CsoDCXZyFD
हेही वाचा- ‘या’ महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चेतावणी, वैज्ञानिकांनी दिले अलर्ट 7 आणि 8 जुलैला राज्यात अनेक ठिकाणी पाऊस 7 आणि 8 जुलै रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांना यॅलो अलर्ट जारी केला आहे. या दोन दिवसांत कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भाग वळगळता राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर देशात मान्सून पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

)







