जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / विधानसभा अध्यक्षपदासाठी नितीन राऊतांच्या नावाची चर्चा, तर प्रणिती शिंदेंची राज्यमंत्रीपदी वर्णी?

विधानसभा अध्यक्षपदासाठी नितीन राऊतांच्या नावाची चर्चा, तर प्रणिती शिंदेंची राज्यमंत्रीपदी वर्णी?

विधानसभा अध्यक्षपदासाठी नितीन राऊतांच्या नावाची चर्चा, तर प्रणिती शिंदेंची राज्यमंत्रीपदी वर्णी?

Maharashtra Assembly Speaker: राज्यपालांनी पाठवलेल्या पत्रानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा मुद्द्यावर बरीच चर्चा रंगू लागली आहे. काँग्रेसमध्ये हालचाली वाढू लागल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 जुलै: पावसाळी अधिवेशनाला (Monsoon session of Maharashtra) जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. मागील अधिवेशनापासून प्रलंबित असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाबाबत (Assembly Speaker) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी राज्य सरकारला पत्र पाठवलं. या पत्रात विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय घ्यावा, याबद्दल आठवण करून दिली. या पाठवलेल्या पत्रानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा मुद्द्यावर बरीच चर्चा रंगू लागली आहे. विधानपरिषदेचं पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलैला होणार आहे. मागील अधिवेशन विधानसभा अध्यक्षाविनाच पार पडले होते. विधानसभा अध्यक्षपदाचं पद हे काँग्रेस (Congress) पक्षाकडे आहे. त्यामुळे काँग्रेसकडून यासाठी मोठ्या हालचाली सुरु झाल्याचं समजतंय. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्षपदासाठी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचा विचार सुरु असल्याचं समजतंय. हेही वाचा-  गुलशन कुमार हत्या प्रकरण: 24 वर्षानंतर High Court चा मोठा निर्णय काँग्रेस पक्षाकडे राज्यातील दलित मतदारांना वळवण्याची सूचना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केली होती. त्यानंतर नितीन राऊत यांचं नाव अध्यपदाच्या शर्यतीत आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याव्यतिरिक्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचंही नाव चर्चेत आहे. प्रणिती शिंदे यांना राज्यमंत्रीपदी संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच काँग्रेसमधून संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमिन पटेल यांच्या नावाचीही चर्चा आहे. विधानसभा अध्यक्ष निवड विधिमंडळ अधिवेशनात होणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा 5 जुलैला होईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. तसंच काँग्रेस पक्षात कोणतीही अंतर्गत नाराजी नसून मी मंत्रिपदाची मागणी केली नसल्याचंही पटोले यांनी म्हटलं आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडत असल्याचं सांगत माझ्यावर कोणताही मंत्री नाराज नसल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. तसंच महाविकास आघाडीतही कोणतेही अंतर्गत वाद नसून शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत दोघांनी अधिवेशन आणि इतर विषयांवर चर्चा केली. या अधिवेशनात आम्ही केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधाक नवे धोरण मांडणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं. हेही वाचा-  अजित पवारांविरोधात मराठा कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, Watch Exclusive Video 23 जून रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी काही मागण्या केल्या. यानंतर 24 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं. विधानसभा अध्यक्षपद महत्वाचे असून पद रिक्त हा मुद्दा मांडण्यात आला. राज्यपालांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीमध्ये हालचालींना वेग आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात