मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सीबीआयनंतर आता ED तळोजा जेलमध्ये जाऊन करणार सचिन वाझेशी चौकशी

सीबीआयनंतर आता ED तळोजा जेलमध्ये जाऊन करणार सचिन वाझेशी चौकशी

Sachin Waze: आता सक्तवसुली संचालनालय (ED) बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची  (Sachin Waze) चौकशी करणार आहे.

Sachin Waze: आता सक्तवसुली संचालनालय (ED) बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची (Sachin Waze) चौकशी करणार आहे.

Sachin Waze: आता सक्तवसुली संचालनालय (ED) बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची (Sachin Waze) चौकशी करणार आहे.

मुंबई, 09 जुलै: आता सक्तवसुली संचालनालय (ED) बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची (Sachin Waze) चौकशी करणार आहे. गुरुवारी वाझे याची तुरुंगात चौकशी करण्याची परवानगी विशेष पीएमएलए (PMLA Court) न्यायालयाने ईडीला दिली. या परवानगीनुसार ईडी तळोजा तुरुंगात जाऊन सचिन वाझेची चौकशी करेल.

वाझे सध्या अँटिलिया विस्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे.

ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पीए सचिव संजीव पलांडे आणि पीए कुंदन शिंदे यांना अटक केली. अटकेनंतर त्यांची चौकशी करण्यात आली. वाझेनी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बामालकांकडून 4 कोटी ७० लाख रुपये वसूल करून दोन हप्त्यांमध्ये शिंदे यांच्याकडे दिले होते, अशी कबुली शिंदे आणि पलांडे यांनी दिल्याचा दावा ईडीने केला आहे.

हेही वाचा- ईडीची पिडा, भोसरीनंतर 'ते' जमीन प्रकरण एकनाथ खडसेंना पडणार महागात?

तसंच अनिल देशमुखांच्या पीएना 70 लाख रुपये दिले होते, असं सचिन वाझेनं जबाबात खुलासा केला होता. अनिल देशमुख थेट आदेश द्यायचे असंही वाझेनं आपल्या जबाबात म्हटलं होतं. या जबाबानुसार वाझेची चौकशी करायची असल्यानं तुरुंगात जाऊन त्याची चौकशी करण्याची परवानगी मिळावी, असा विनंती अर्ज ईडीने केला होता. तो अर्ज न्यायालयाने मान्य केला आहे.

First published:
top videos

    Tags: Sachin vaze, Sachin waze