मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने महाराज गायब; VIDEO केला व्हायरल, सुसाईड नोटही लिहिली

विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने महाराज गायब; VIDEO केला व्हायरल, सुसाईड नोटही लिहिली

या संपूर्ण घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

या संपूर्ण घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

या संपूर्ण घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

बीड, 8 फेब्रुवारी : बीडच्या गेवराई तालुक्यातील कोळगावमध्ये असणाऱ्या सूर्यमंदिराच्या हनुमान महाराजांवर गेल्या दोन दिवसांपूर्वी चकलांबा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर महाराजांनी यावर स्पष्टीकरण दिलं. तसंच तो गुन्हा मी केलाच नाही, अशी सुसाईड नोट लिहून आणि एक व्हिडिओ व्हायरल करून हनुमान महाराज गायब झाले आहेत. या संपूर्ण घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

हनुमान महाराज यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे, की मी हनुमान महाराज सूर्य मंदिर कोळगाव...माझी काही चूक नसताना, पैशासाठी आणि मला बदनाम करण्यासाठी व मला संपवण्यासाठी माझ्या विरोधात पूर्वनियोजित कट रचण्यात आला. त्यात कांबळे परिवार पूर्णपणे जबाबदार आहे..माझी नाहक बदनामी केल्यामुळे व माझ्या चारित्र्यावर आक्षेप घेतल्यामुळे जसं भगवान बाबांनी लिंग कापलं होत...तसं मला जगण्याची इच्छा नसल्यामुळे, मी आत्महत्या करीत आहे. त्यामुळे मी लगेच आत्महत्या करत असून मला न्याय देण्यात यावा..असं लिहून गावातील दहा लोकांसह सरपंचाचं नाव देखील या सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे.

हेही वाचा - घटस्फोटीत शिक्षिकेची गळफास घेऊन आत्महत्या; 6 वर्षांची चिमुरडी आईसाठी करतेय आक्रोश

दरम्यान, सुसाईड नोटसह एक व्हिडिओ देखील हनुमान महाराज यांनी जारी केला आहे. या व्हिडिओद्वारे हनुमान महाराजांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली असून पोलीस अन् गावकरी महाराजांचा शोध घेत आहेत.

First published:

Tags: Beed, Crime news