मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /चोरीच्या संशयावरून जमावाकडून तिघांना बेदम मारहाण; एकाचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसऱ्या घटनेने हादरलं बीड

चोरीच्या संशयावरून जमावाकडून तिघांना बेदम मारहाण; एकाचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसऱ्या घटनेने हादरलं बीड

 
रात्री दीड वाजेच्या सुमारास रेल्वे समांतर रस्त्यावर काही जणांनी त्यांची रिक्षा अडवली. दोघांना बाहेर काढले आणि...

रात्री दीड वाजेच्या सुमारास रेल्वे समांतर रस्त्यावर काही जणांनी त्यांची रिक्षा अडवली. दोघांना बाहेर काढले आणि...

धक्कादायक चोरीच्या संशयावरून तिघांना बेदम मारहाण मारहाणीत एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

बीड, 29 सप्टेंबर : बीडच्या पाटोदा तालुक्यातील (Patoda Taluka Beed) पारनेर येथे चोरीच्या संशयावरून पारधी वस्तीवर मारहाणीत चिमुकला आणि वयोवृद्धाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता पुन्हा तसाच प्रकार समोर आला आहे. पुन्हा चोरीच्या संशयावरून तिघांना जबर मारहाण (Mob attack on three people in Beed) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जमावाने केलेल्या या मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र त्या दोघा गंभीर जखमींचा अद्यापही शोध लागलेला नाही. ही घटना केज तालुक्यातील हनुमंत पिंप्री गावात सोमवारी रात्री घडली आहे.

शिवाजी नामदेव काळे ( वय 20 रा. टोकणी ता. इटकूर जि. उस्मानाबाद) असं मयत तरुणाचं नाव आहे. तर दीपक अशोक शिंदे आणि आकाश बापू काळे असं गंभीर जखमीचं नाव आहे. याविषयी मृताचे सासरे अशोक भिमराव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा जावई शिवाजी नामदेव काळे, मुलगा दीपक अशोक शिंदे आणि आकाश बापू काळे हे आरणगावकडून काळेगाव हनुमंत पिंपरीमार्गे त्यांच्या मोटारसायकलने गावाकडे जात असताना, सोमवारी रात्री 12.30 च्या दरम्यान आरणगावच्या पुलावरून पाणी वाहत असताना, त्यांनी पुलावरून गाडी नेली. गाडीत पाणी गेल्यामुळे गाडी बंद पडली. मात्र, प्रसंगावधान राखून ते गाडीवरून खाली उतरले. गाडी ढकलत-ढकलत ते पुढे जाऊ लागले.

हृदयद्रावक! विवाहित महिला-पुरुषाचं एकमेकांवर जडलं प्रेम; लॉजमध्येच झाला लव्ह स्टोरीचा The End

हनुमंत पिंपरी येथे आले असताना चोर समजून जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात शिवाजी नामदेव काळे याचा मारहाणीत जागीच मृत्यू झाला. तर दीपक अशोक शिंदे आणि आकाश बापू काळे हे जखमी झाले. शिवाजी नामदेव काळे याचा मृत्यू होताच जमावाने त्यांना एका ट्रॅक्टरने बोरगाव चौका रस्त्याच्या कडेला नेऊन टाकून दिले. त्यानंतर जखमी दीपक शिंदे व आकाश काळे हे भीतीने गावाकडे पायी जायला निघाले. मात्र, त्यांचा सकाळपर्यंत तपास लागला नाही अशी माहिती अशोक भिमराव शिंदे यांनी दिली. दरम्यान मयत शिवाजी काळे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पाटण्यात चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलाला मारहाण

बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये एका व्यक्तीचा मोबाईल चोरीला गेला. हा मोबाईल पीडित अल्पवयीन मुलानेच चोरला असल्याचा संशय काहीजणांना आला. सत्य समजून घेण्याआधीच तिथे गोळा झालेल्या जमावाने अल्पवयीन मुलावर चोरीचा आळ घेतला. संतप्त जमावाने या मुलाला अगोदर गाडीला बांधले आणि मारहाण केली. त्यानंतर या मुलाला वीजेचा शॉक देण्याची कल्पना जमावातील एकाला सुचली आणि इतरांनी त्याला पाठिंबा दिला. गाडीला बांधलेल्या या मुलाला वीजेचा शॉक देऊन त्याच्यावर अत्याचार करण्यात आले.

पोलिसांची धाव

ही घटना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जमावाच्या तावडीतून त्यांनी मुलाला सोडवलं आणि हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केलं. या प्रकारामुळे हा मुलगा घाबरला होता आणि त्याला अनेक जखमा झाल्या होत्या. या मुलावर हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या पालकांकडे सोपवलं आहे.

First published:

Tags: Beed, Crime