जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मनसे Vs संभाजी ब्रिगेड वाद पेटला, आजोबांची पुस्तकं पाठवली 'कृष्णकुंज'वर!

मनसे Vs संभाजी ब्रिगेड वाद पेटला, आजोबांची पुस्तकं पाठवली 'कृष्णकुंज'वर!

राज ठाकरे यांनी 'बाबासाहेबांनी अभ्यासपूर्ण इतिहास लिहिल्याचे म्हटले होते' त्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला होता.

राज ठाकरे यांनी 'बाबासाहेबांनी अभ्यासपूर्ण इतिहास लिहिल्याचे म्हटले होते' त्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला होता.

राज ठाकरे यांनी ‘बाबासाहेबांनी अभ्यासपूर्ण इतिहास लिहिल्याचे म्हटले होते’ त्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 05 ऑगस्ट : पुण्यात (pune) मनसे (mns) आणि संभाजी ब्रिगेडमध्ये (sambhaji brigade) वाद पेटला आहे. आता संभाजी ब्रिगेडकडून राज ठाकरे (raj thackery) यांना आजोबा प्रबोधनकार ठाकरे (prabodhankar thackeray) यांची पुस्तके पोस्टाने पाठवण्यात आली आहे. त्यामुळे, मनसे आणि संभाजी ब्रिगेडमध्ये वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभरीत पदार्पणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी ‘बाबासाहेबांनी अभ्यासपूर्ण इतिहास लिहिल्याचे म्हटले होते’ त्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला होता. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात धो-धो; काही तासांत या जिल्ह्यांत धडकणार पाऊस मनसेचे नेते वसंत मोरे यांनी प्रवीण गायकवाड यांनी धमकी दिली होती. त्यानंतर आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर निशाणा साधला. आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेली ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं’ ‘खरा ब्राम्हण’ आदी पुस्तकंच राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवास्थानी कृष्णकुंजवर पाठवली आहे. दरम्यान, ‘राज ठाकरे यांना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, अशी टीका प्रविण गायकवाड यांनी केली होती. बंजारा समाजाचे धर्मगुरू मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, संजय राठोडांचं कमबॅक? त्यानंतर  मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनीही प्रवीण गायकवाड यांनी जशास तसे उत्तर दिले. 2019 च्या निवडणुकीत पुण्यात फिरत असताना मी प्रवीण गायकवाड अशी ओळख द्यावी लागत होती, तुम्हाला राज ठाकरे काय आहे हे कळणार सुद्धा नाही. त्यामुळे लायकीत राहायचे नाहीतर पुण्यात फिरणे मुश्किल होईल, अशी धमकीच वसंत मोरेंनी दिली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात