Home /News /maharashtra /

आदित्य यांच्यावर वॉच ठेवणार अमित ठाकरे

आदित्य यांच्यावर वॉच ठेवणार अमित ठाकरे

आदित्य ठाकरेंवर मनसेचे अमित ठाकरे नजर ठेवणार असल्याने लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत

    मुंबई, 9 मार्च : आज नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरकारवर वचक ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटचं उद्घाटन केलं. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कॅबिनेटची घोषणा केली. यामध्ये मनसेच्या अनेक नेत्यांकडे कॅबिनेटमधील मंत्र्याच्या कामावर नजर ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली. आज 9 मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्मिण सेनेचा 14 वा वर्धापन दिवस आहे. यानिमित्ताने राज ठाकरेंनी शॅडो कॅबिनेटमध्ये मनसेच्या नेत्यांकडे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे नगरविकास व पर्यटन खातं आहेत. त्यांच्यावर वॉच ठेवण्याची जबाबदारी राज ठाकरे यांचे सुपूत्र व आताच सक्रिय राजकाणात दाखल झालेले मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेच्या या शॅडो कॅबिनेटमध्ये बाळा नांदगावकर, संदिप देशपांडे, अभिजित पानसे, नितीन सरदेसाई आणि अमेय खोपकर यांचा समावेश आहे. येत्या एप्रिल मध्ये नवी मुंबईत महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करून आपला भगवा झेंडा राज्यभर नेऊया असं आवाहन बाळ नांदगावकर यांनी यावेळी बोलताना केलं. राजसाहेबांची वाणी तलवारीसारखी चालत असते आणि त्या वाणीच्या आदेशानुसार महाराष्ट्र सैनिक देखील धारधार कामगिरी करूया असंही त्यांनी सांगितलं. हे वाचा - कोरोनामुळे ठाकरे सरकार करणार IPL रद्द? ‘या’ दिवशी होणार फैसला असं आहे मनसेचं शॅडो कॅबिनेट वित्त आणि गृहनिर्माण - नितीन सरदेसाई जलसंपदा अनिल शिदोरे गृह, विधी व न्याय, सामान्य प्रशासन बाळा नांदगावकर महसूल आणि परिवहन - अविनाश अभ्यंकर सहकार आणि पणन - दिलीप धोत्रे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण - रिटा गुप्ता शालेय उच्च शिक्षण - अभिजित पानसे नगर विकास आणि पर्यटन - संदिप देशपांडे , अमित ठाकरे कामगार - राजेंद्र वागसकर , गजानन राणे , सुरेंद्र सुर्वे वने आपत्ती व्यवस्थापन , मदत पुनर्वसन - अमित ठाकरे , संजय चित्रे , संतोष धुरी ग्रामविकास - अमित ठाकरे उर्जा - शिरीष सावंत , सागर देवऱह सांस्कृतिक कार्य - अमेय खोपकर रोजगार हमी आमि फलोत्पादन - बाळा शेडगे सार्वजनिक उपक्रम - संजय शिरोडकर सार्वजनिक बांधकाम - योगेश परुळेकर सामाजिक न्याय - गजानन काळे महिला बालविकास - शालिनी ठाकरे , सुनीता चुरी अन्न नागरी पुरवठा - राजा चौघुले उत्पादन - वसंत फडके आदिवासी विकास - आनंद एंबडवार पर्यावरण - रुपाली पाटील, किर्तीकुमार शिंदे, देवव्रत पाटील पाण पुरवठा - अरविंद गावडे केतन जोशी - सामान्य प्रशासन आणि इतर महत्त्वाचे विभाग

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Aaditya thackeray, Amit thackray, Raj Thackray, Shivsena, मुंबई, शिवसेना

    पुढील बातम्या