पुणे, 11 जुलै: बुधवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ (Cabinet Expansion) विस्तार पार पडला. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपचे (BJP) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली. मोदींनी नारायण राणेंकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी सोपवली आहे. मंत्रिपद जाहीर झाल्यानंतर नारायण राणेंना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही (MNS Chief Raj Thackeray) राणेंना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. पण त्यांचा फोन बंद होता, असं राज ठाकरेंनी सांगितलं. राज ठाकरेंनीही राणेंना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. मात्र तेव्हा त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा फोन बंद होता. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचं राज ठाकरे म्हणालेत. पुण्यात राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावर प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, मी शुभेच्छा देण्यासाठी नारायण राणे आणि त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर फोन केला होता. मात्र दोघांचेही फोन बंद होते. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं झालं नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत पुन्हा संपर्क करुन त्यांना शुभेच्छा देईल, असं राज ठाकरे म्हणालेत. हेही वाचा- मोदींनी नारळ दिलेल्या ‘या’ दोन नेत्यांना पक्षात मिळणार मोठी जबाबदारी मराठा आरक्षणावर राज ठाकरेंचे परखड सवाल मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्यावर मराठा समाजातील तरुण-तरुणींची माथी भडकवण्याचे काम सुरू आहे. जर सर्व पक्षीय नेत्यांनी आणि केंद्र आणि राज्य सरकारला जर मान्य असेल तर मराठा आरक्षणाचा मुद्या अडला कुठे? असा परखड सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थितीत केला. हेही वाचा- मोठी बातमी: ‘अल कायदा’ चे दोन संशयित दहशतवादी अटकेत, बॉम्बसह शस्त्रास्त्रं जप्त ‘मराठा आरक्षणाच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचे सरकार होते. त्यावेळी मुंबईतून मोर्चा निघाला होता. त्या मोर्चात सर्वच नेते गेले होते. सर्वांना मान्य आहे मग अडलंय कुठे, मराठा समाजातील तरुणी आणि तरुणांची माथी भडकवण्याचे काम सुरू आहे. जर केंद्रातील आणि राज्यातील सरकारला सुद्धा मान्य आहे तर मग अडलं कुठंय, आपण जे बोलतोय, ज्या बातम्या येत आहे, हे सर्व वरवरचं आहे. सर्वच मान्य असेल तर अडवलं कुणी? पण मुळात कोर्टामध्ये याची बाजू व्यवस्थित मांडली का जात नाही. हा काही आरोप प्रत्यारोपाचा प्रश्न नाही. हे केंद्रामुळे होतं, राज्यामुळे होतं, असं कुणी म्हणू शकत नाही. सर्वांना एकदा व्यासपीठावर बोलावून नेमकं काय ते विचारलं पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.