मुंबई, 16 नोव्हेंबर : 15-20 वर्षांपूर्वीचे व्हिडीओ मनसे आता काढत आहे. मनसेकडे मुळात जाणते नेतृत्व नाही. उर्मटपणाला नेतृत्व म्हणत नाहीत. उद्धव ठाकरेंकडे सुसंस्कृतपणा आहे, असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पहिल्यांदाच मनसेवर टीकास्त्र सोडले. सुषमा अंधारे कोल्हापूरच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान यावर मनसेने सुषमा अंधारे यांचा बाळासाहेबांवर टीका केलेला जुना व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे.
८०-८५ वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार देवून काय उपयोग आहे,हात थरथर करायला लागले आहेत,असं बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल विधान करणं याला उर्मटपणा म्हणतात. महाढोंगी यात्रेत राजसाहेबांच्या लावरे तो व्हिडिओला उर्मटपणा म्हणण्या अगोदर राजकारणातील अलका कुबल यांनी हा व्हिडिओ बघावा. असे म्हणत सुषमा अंधारे यांच्या जोरदार टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी काल (दि.15) कोल्हापूर येथे महाप्रबोधन यात्रेत राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावरून मनसेने त्यावर पलटवार केला आहे.
८०-८५ वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार देवून काय उपयोग आहे,हात थरथर करायला लागले आहेत,असं बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल विधान करणं याला उर्मटपणा म्हणतात..
महाढोंगी यात्रेत राजसाहेबांच्या लावरे तो व्हिडिओला उर्मटपणा म्हणण्या अगोदर राजकारणातील अलका कुबल यांनी हा व्हिडिओ बघावा.. pic.twitter.com/hNbDLmTXlz — Gajanan Kale (@GajananKaleMNS) November 16, 2022
हे ही वाचा : शिंदे गट आणि भाजपध्ये धुसफूस, मध्यावधी लागणारच, सुषमा अंधारेंचं भाकित
काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे
'15-20 वर्षांपूर्वीचे व्हिडीओ मनसे आता काढत आहे. मनसेकडे मुळात जाणते नेतृत्व नाही. उर्मटपणाला नेतृत्व म्हणत नाहीत. उद्धव ठाकरेंकडे सुसंस्कृतपणा आहे, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पहिल्यांदाच मनसेवर टीकास्त्र सोडले. तसंच, देवेंद्र फडणवीस यांना विनयभंगाची व्याखा शिकवावी लागेल, असा टोलाही अंधारे यांनी लगावला.
सुषमा अंधारे कोल्हापूरच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यातील घडामोडी आणि शिंदे सरकारवर जोरदार टीकाही केली.
'2023 ला मध्यवधी निवडणुका लागतील, भाजपमध्ये धुसफुस सुरू आहे. बाहेरून आलेल्यांना स्पेस दिला जातो यातून खदखद सुरू आहे. त्यामुळे निवडणुका लागण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांना मानणारा वर्ग भाजपवर नाराज आहे. याचे परिणाम भोगावे लागणार आहे.
हे ही वाचा : विनायक मेटे कार अपघात प्रकरणाला नवे वळण, सीआयडीची मोठी कारवाई
शिंदे गटातही मंत्रिपदाची आमिषे पूर्ण होत नाहीत. संजय शिरसाट नाराज आहेत,तसे इतरही नाराज आहेत. भाजपने शिंदे गटाला संपवण्याचे धोरण सुरू केले आहे, अशी टीका अंधारे यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Raj Thackeray (Politician), Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)