जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मदत कार्यात अडथळे येतील म्हणून पहिल्या दिवशी पूरग्रस्तांच्या मदतीला येणं टाळलं, शर्मिला ठाकरेंनी सांगितलं कारण

मदत कार्यात अडथळे येतील म्हणून पहिल्या दिवशी पूरग्रस्तांच्या मदतीला येणं टाळलं, शर्मिला ठाकरेंनी सांगितलं कारण

मदत कार्यात अडथळे येतील म्हणून पहिल्या दिवशी पूरग्रस्तांच्या मदतीला येणं टाळलं, शर्मिला ठाकरेंनी सांगितलं कारण

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी राज्यात आलेल्या पूरस्थितीवर (State Flood) प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 जुलै: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी राज्यात आलेल्या पूरस्थितीवर (State Flood) प्रतिक्रिया दिली आहे. तसंच पूर आल्याच्या पहिल्याच दिवशी मला तिथे जाऊन पूरग्रस्तांना मदत करण्याची इच्छा होती. पण ते का शक्य झालं नाही, याचा देखील उलगडा त्यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी आधी पूरग्रस्तांना मदत पोहोचवावी असं सांगितलं होतं. पूर आल्या त्याच दिवशी राज ठाकरे आणि आम्ही कुटुंबियांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाण्याचं टाळलं. म्हणून मी उशिरा येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पुणेकरांसाठी आनंदाची बातमी!  खडकवासलानंतर हे धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर मला पहिल्याच दिवशी पूरग्रस्त भागाला भेट द्यायची इच्छा होती. आपण त्या ठिकाणी भेट दिल्यास तिकडे सुरू असलेल्या मदत कार्यात काही अडथळे आले असते. त्यामुळे तेव्हा येणं टाळल्याचं त्या म्हणाल्या आणि म्हणूनच राज ठाकरे आणि आम्ही कुटुंबीयांनी पूरग्रस्त भागात जाणं टाळलं, असं शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं. मनसे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कायम उभी असल्याचंही शर्मिला ठाकरेंनी नमूद केलं आहे. पूरग्रस्तांसाठी मनसेकडून मदत सुरू असून अनेक जीवनावश्यक वस्तूंचे ट्रक मनसेकडून पाठवण्यात आल्याचं मनसे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं. या महापूरात लोकांच्या बँकेच्या कागदपत्रांपासून ते घरातील सर्व सामान वाहून गेलं. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आम्ही पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू मदत म्हणून पाठवत आहोत. राज ठाकरेंच्या आवाहनानंतर मनसेचे अनेक ट्रक मदत घेऊन जाताहेत. मदत सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते काम करत आहेत. मनसेची मदत पोहोचल्याचं तेखील पोलिसांनी फोन करुन सांगितलंच शर्मिला ठाकरे म्हणाल्यात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात