जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / MLC Election UPDATES : मतदान करणारच! भाजप आमदार रुग्णवाहिकेतून मुंबईकडे रवाना, VIDEO

MLC Election UPDATES : मतदान करणारच! भाजप आमदार रुग्णवाहिकेतून मुंबईकडे रवाना, VIDEO

भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे आज पुन्हा एकदा खाजगी रुग्णवाहिकेने पिंपरी चिंचवड वरून मुंबई येथील विधिमंडळाकडे निघाले आहे.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे आज पुन्हा एकदा खाजगी रुग्णवाहिकेने पिंपरी चिंचवड वरून मुंबई येथील विधिमंडळाकडे निघाले आहे.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे आज पुन्हा एकदा खाजगी रुग्णवाहिकेने पिंपरी चिंचवड वरून मुंबई येथील विधिमंडळाकडे निघाले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पिंपरी चिंचवड, 20 जून  : विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. एक एक आमदार आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहे.  विशेष म्हणजे, भाजपचे पुण्यातील दोन आमदार हे आजारी आहेत. पण, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येणार आहे. पिंपरी चिंचवडचे  भाजप आमदार लक्ष्मण जगताप आजारी असल्याने रुग्णवाहिकेतून डॉक्टरांच्या पथकासह रवाना झाले आहे. चिंचवड विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे आज पुन्हा एकदा खाजगी रुग्णवाहिकेने पिंपरी चिंचवड वरून मुंबई येथील विधिमंडळाकडे निघाले आहे.  लक्ष्मण जगताप हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. त्यांची प्रकृती ही अत्यंत नाजूक आहे. पण, अशा परिस्थितीतही त्यांनी राज्यसभेला मतदानाचा हक्क बजावला होता. आता विधान परिषद निवडणुकांच्या मतदानासाठी एका खासगी कार्डियाक रुग्णवाहिकेनं मुंबईकडे रवाना झाले आहे. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे निकटवर्तीय आणि एक डॉक्टरांचा पथक हे लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असणार आहे.

जाहिरात

विशेष म्हणजे,  विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप यांना तुम्ही तब्येतीची काळजी घ्या मतदानाला येऊ नका असं सांगितलं होतं.  मात्र तरीही लक्ष्मण जगताप मतदानाला येण्यावर ठाम होते. लक्ष्मण जगताप दुपारपर्यंत मतदानाला पोहोचणार आहे. तर, दुसरीकडे भाजपच्या आमदार मुक्ता टिळक या विधिमंडळात दाखल झाल्या आहेत. सकाळीच त्या पुण्यातून रवाना झाल्या होत्या. विधिमंडळात दाखल झाल्यानंतर भाजपच्या आमदारांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. तर खुद्द गिरीश महाजन यांनी व्हिलचेर ओढत नेऊन त्यांना विधान परिषदेत नेलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात