मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /विधान परिषदेच्या मुंबई मतदारसंघासाठी शिवसेनेतून 'या' नावांची चर्चा, बडे नेते शर्यतीत

विधान परिषदेच्या मुंबई मतदारसंघासाठी शिवसेनेतून 'या' नावांची चर्चा, बडे नेते शर्यतीत

येत्या 10 डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थेमधून माजी मंत्री रामदास कदम (Former Minister Ramdas Kadam) यांची जागा रिक्त होणार आहे.

मुंबई, 12 नोव्हेंबर: येत्या 10 डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थेमधून माजी मंत्री रामदास कदम (Former Minister Ramdas Kadam) यांची जागा रिक्त होणार आहे. या रिक्त जागेवर शिवसेनेतून काही नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. मुंबई मतदारसंघाच्या जागेवर शिवसेनेतून वरळीचे माजी आमदार (former Shiv Sena MLA Sunil Shinde) सुनील शिंदे, शिवसेना उपनेते आणि माजी राज्यमंत्री (former Minister of State Sachin Ahir) सचिन अहिर, युवासेना सरचिटणीस वरुण (Yuvasena General Secretary Varun Sardesai) सरदेसाई, विद्यमान महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar), शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे.

माजी आमदार सुनील शिंदे यांनी 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपली जागा रिक्त केली. त्यामुळे त्यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. त्यातच 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेना पक्षात प्रवेश करणारे गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांचं नाव देखील चर्चेत आहे.

हेही वाचा-  Corona लस नाहीतर ही गोळी ठरेल उपचारासाठी 'Game Changer'

सध्या शिवसेनेचा नवा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले आणि आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांच्या नावाचीही चर्चा आहे. वरुण सरदेसाई सध्या युवासेनेचे सरचिटणीस आहेत. दरम्यान 2024 मध्ये विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून वरुण सरदेसाई विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचंही बोललं जात आहे.

हेही वाचा-  पुन्हा चकमक, जवानांनी घेरलं दहशतवाद्यांना; एकाचा खात्मा तर एकाचा शोध सुरु

त्यातच सध्याच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नावावर जोर दिला जात आहे. किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

रामदास कदम यांचा पत्ता कट

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना ऑडिओ क्लिप प्रकरण चांगलंच भोवलेलं दिसत आहे. रामदास कदम यांचा विधान परिषदेच्या उमेदवारीतून पत्ता कट करण्यात आल्याचं समजतंय. काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात पुरावे दिल्याचं बोललं जात आहे. या सर्व प्रकरणामुळे रामदास कदम यांचा विधानपरिषदेतून पत्ता कट करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Kishori pedanekar, Sachin ahir, Shiv Sena (Political Party)