मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'उदयनराजेंच्या बुद्धीचा अविष्कार आणि पराक्रम सर्वांनी पाहिलाय', शिवेंद्रराजेंचा खोचक टोला

'उदयनराजेंच्या बुद्धीचा अविष्कार आणि पराक्रम सर्वांनी पाहिलाय', शिवेंद्रराजेंचा खोचक टोला

"उदयनराजेंची बुद्धी अचाट आहे. त्यांच्या बुद्धीची कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही", असा खोचक टोला शिवेंद्रराजेंनी  (Shivendraraje Bhosale) लगावला आहे.

"उदयनराजेंची बुद्धी अचाट आहे. त्यांच्या बुद्धीची कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही", असा खोचक टोला शिवेंद्रराजेंनी (Shivendraraje Bhosale) लगावला आहे.

"उदयनराजेंची बुद्धी अचाट आहे. त्यांच्या बुद्धीची कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही", असा खोचक टोला शिवेंद्रराजेंनी (Shivendraraje Bhosale) लगावला आहे.

सातारा, 20 डिसेंबर : सातारा (Satara) नगरपालिका निवडणुकीच्या अगोदरच दोन्ही राजेंमधला संघर्ष पेटताना दिसत आहे. दोन्ही राजेंकडून एकमेकांवर टीकेची झोड उठवली जात आहे. "आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांचं वय वाढलं. मात्र त्यांची बुद्धी वाढली नाही", अशी टीका खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता शिवेंद्रराजेंनी उत्तर दिलं आहे. "उदयनराजेंची बुद्धी अचाट आहे. त्यांच्या बुद्धीची कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही", असा खोचक टोला शिवेंद्रराजेंनी लगावला आहे.

'त्यांच्या बुद्धीचे अविष्कार आणि पराक्रम सर्वांनी पाहिले'

"उदयनराजेंची बुद्धी अफाट आणि अचाट आहे. त्यांच्या बुद्धीशी कुणासोबत तुलना होऊ शकत नाही. त्यांच्या बुद्धीचे अविष्कार आणि पराक्रम सर्वांनी पाहिले आहेत. लोकांनी निवडून दिलेली लोकसभेची जागा घालवून राज्यसभेत जाऊन बसले. जिथं तुम्ही पुढच्या दाराने जाऊन बसला होता तिथं आता तुम्ही मागच्या दाराने जाऊन खासदार म्हणून बसलाय", अशा शब्दांत शिवेंद्रराजेंनी टीका केली.

'दिवाळीचे डब्बे घेऊन जाण्याची गरज काय होती?'

"तुमची स्वत:ची बुद्धी एवढी मोठी असताना जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी संचालकपदासाठी एवढ्या सगळ्यांचे उंबरठे कशाला झिझवायला लागले? दिवाळीचे डब्बे घेऊन जाण्याची गरज काय होती? रामराजे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे यांच्याकडे डब्बे घेऊन जाण्याची गरज काय होती?", असे प्रश्न शिवेंद्रराजेंनी उपस्थित केले.

हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सर्वात मोठी बातमी! संपाची नोटीस देणारे अजय गुजर यांची संप मागे घेण्याची घोषणा

नेमकं प्रकरण काय?

शिवेंद्रराजेंनी काही दिवसांपूर्वी उदयनराजेंवर टीका केली होती. यामध्ये उदयनराजेंची गँग म्हणजे नारळफोड्या गँग असा उल्लेख केला होता. यामुळे नाराज झालेल्या उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना रविवारी (19 डिसेंबर) फटकारलं होतं. "आम्ही नारळ वाढवून लोकांची चांगली कामं करतो. मात्र तुम्ही तर लोकांची घरच फोडायचं काम केलं. जिल्ह्यातील लोकांनी विश्वास ठेवत तुमच्या बँकांमध्ये पैसे ठेवले. मात्र त्यांना फसवत तुम्ही त्यांचीच घरं फोडायची कामं केली. त्यामुळे लोकांची घर फोडण्यापेक्षा आमची नारळ फोडून लोकांची कामं करणारी गँग चांगली", असं उदयनराजें एका कार्यक्रमात म्हणाले होते.

हेही वाचा : मुहूर्त ठरला, शिवसेना यूपीएत सहभागी होणार; सोनिया गांधींच्या उपस्थित प्रवेश सोहळा

"वय वाढल्यामुळे त्यांची बुद्धी सुद्धा लहान, मुलाच्या बुद्धी पेक्षा कमी झाली आहे. त्यामुळेच त्यांनी आमच्यावर असा आरोप केला आहे. वैयक्तिक पातळीवर जावून टीका करणं हे माझ्या लेवलचं समजत नाही. मात्र अत्यंत संकोचित वृत्तीची ही लोकं आहेत. त्यांनी आरोप करताना विचार करायला पाहीजे. तसंच लोकांची आमच्याकडूनच कामांची अपेक्षा आहे. त्यामुळेच आम्ही कामांचे नारळ फोडतो", असंही उदयनराजे म्हणाले होते.

First published: