मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरण: नितेश राणेंचा पीए राकेश परब कणकवली पोलिसांना शरण, चौकशी सुरु

शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरण: नितेश राणेंचा पीए राकेश परब कणकवली पोलिसांना शरण, चौकशी सुरु

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब (Rakesh Parab) कणकवली पोलिसांना (Kankavli police) शरण आले आहेत.

    कणकवली, 31 जानेवारी: शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब (Rakesh Parab) कणकवली पोलिसांना (Kankavli police) शरण आले आहेत. राकेश परब हे सोमवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले. परब यांनी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांची भेट घेतली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांच्याकडून परब यांची चौकशी सुरू आहे. चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी परब यांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक झाली. BMC Election 2022: मुंबई महापालिका 2022 निवडणुका कधी?, समोर आली मोठी अपडेट राकेश परब यांच्या मोबाईल फोनवरुन 36 कॉल केले होते. इतर आरोपींनाही कॉल केले होते. तसंच राकशेच्या मोबाईलवरुन हल्ला ज्याच्यावर करायचा आहे, त्याचा फोटो देखील पाठवण्यात आला होता असा संशय पोलिसांना आहे. नितेश राणेंना मोठा झटका, जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सुप्रीम कोर्टाकडून 10 दिवसांची मुदत सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या (Sindhudurg District Central Co operative Bank Election) रणधुमाळीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत (Satish Sawant) यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. गाजर किंवा दुधी नाही तर चक्क हिरव्या मिरचीचा हलवा! तुम्ही कधी खाल्ला आहे का? या प्रकरणात आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर अटकेपासून त्यानंतर नितेश राणे यांनी अटक पूर्व जामीनासाठी सिंधुदुर्गातील न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अखेर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. या अर्जावर 27 जानेवारीला सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास 10 दिवसांची मुभा दिली आणि तोपर्यंत नितेश राणे यांना अटक करता येणार नाही आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Maharashtra, Maharashtra News, Mumbai high court, Nitesh rane, Supreme court

    पुढील बातम्या