मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BMC Election 2022: मुंबई महापालिकेच्या निवडणुका मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार?

BMC Election 2022: मुंबई महापालिकेच्या निवडणुका मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार?

BMC Election 2022: मुंबई पालिका निवडणुकांसंदर्भात (Mumbai Municipal Corporation Elections)  महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

BMC Election 2022: मुंबई पालिका निवडणुकांसंदर्भात (Mumbai Municipal Corporation Elections) महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

BMC Election 2022: मुंबई पालिका निवडणुकांसंदर्भात (Mumbai Municipal Corporation Elections) महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

मुंबई, 31 जानेवारी: मुंबई पालिका निवडणुकांसंदर्भात (Mumbai Municipal Corporation Elections) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्यानं मुंबई महापालिकेच्या निवडणुका मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणे किंवा कार्यकाल वाढवून देण्याची शक्यता कमी झाली आहे. मुंबई महापालिकेचा कार्यकाल हा 9 मार्चपर्यंत आहे. त्याआधी निवडणूक जाहीर झाली तर आचारसंहितेमुळे सर्व कामकाज प्रशासनाच्या हातात जाईल. त्यामुळे या प्रशासक आणि महापालिकेचा कालावधी वाढवणं याची गरज राहाणार नाही. मुंबई महापालिका 2022 निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा आराखडा तयार राज्य निवडणूक आयोगाचं (State Election Commission) पालिका आयुक्तांना पत्र पाठवण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) तयार केलेला वॉर्ड पुनर्रचना आराखड्याला निवडणूक आयोगाने प्राथमिक मंजुरी देण्यात दिली आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये 227 ऐवजी आता 236 वॉर्ड असतील. आता या संदर्भातील प्रारुप आराखडा कसा असेल, आरक्षण कशा पद्धतीने असेल याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून दिली आहे. सोबतच या प्रारूप आराखडा दिल्यानंतर यावर हरकती सूचना मागवल्या जाणार आहेत. मुलगा अविष्कारसाठी आमदार विजय रहांगडाले यांचा काळीज चिरणारा टाहो... प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता आणि निवडणूक प्रभागाच्या सीमा जाहीर करून हरकती आणि सूचना मागविणे आणि त्यानुसार सुनावणी देण्याचा कार्यक्रमासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र यामध्ये ओबीसी आरक्षण संदर्भात कुठलाही उल्लेख नाहीये त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी जागा या खुल्या प्रवर्गातील समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. या प्रारूप आराखड्यानुसार एकूण मुंबईत महापालिका वॉर्ड 236 असतील. मुंबई महापालिका एकूण वार्ड 236 आरक्षण खुला प्रवर्ग 219 एससी 15 एसटी 2 महिला जागा खुला प्रवर्ग 118 एससी 8 एसटी 1 हरकती व सूचना मागविणे व त्यानुसार सुनावणी देण्याचा कार्यक्रम नेमका कसा असणार ? 1 फेब्रुवारी - निवडणूक प्रभागाच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्र पत्रात प्रसिद्ध करणे व त्यास प्रसिद्धी देणे 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान प्रारूप आधी सूचनेवर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी 16 फेब्रुवारी प्राप्त झालेला हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करणे 26 फेब्रुवारी- राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचनासंदर्भात सुनावणी देण्याचा अंतिम दिनांक 2 मार्च - सुनावणी नंतर प्राधिकृत अधिकारी यांनी केलेल्या शिफारसी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठवण्याचा दिनांक. राज्य निवडणूक आयोगाने मुंबई मनपाला पत्र लिहून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी मनपाच्या प्रारुप रचनेचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार, महानगरपालिकेच्या निवडणूक प्रभागांची लोकसंख्या, सदस्य संक्या दर्शवणारे सहपत्र 1 अंतिम करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेला त्यानुसार मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात भीषण अपघात; लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, 5 जणांचा मृत्यू  प्रभाग रचना प्रक्रियेला मंजुरी दिल्याने आता निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. कारण, प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीन दिवसांनंतर कधीही निवडणूक जाहीर करता येते.
First published:

Tags: BMC, Mumbai muncipal corporation, Mumbai News, Muncipal corporation

पुढील बातम्या