मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अटकेत असणाऱ्या आमदाराची सुटका होताच समर्थकांचा जल्लोष, लॉकडाऊनचे निर्बंध मोडत काढली rally

अटकेत असणाऱ्या आमदाराची सुटका होताच समर्थकांचा जल्लोष, लॉकडाऊनचे निर्बंध मोडत काढली rally

Jalgaon News :  आमदार चव्हाण यांच्या सुटकेनंतर मध्यवर्ती कारागृहाबाहेर त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करत जल्लोषात रॅली काढली.

Jalgaon News : आमदार चव्हाण यांच्या सुटकेनंतर मध्यवर्ती कारागृहाबाहेर त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करत जल्लोषात रॅली काढली.

Jalgaon News : आमदार चव्हाण यांच्या सुटकेनंतर मध्यवर्ती कारागृहाबाहेर त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करत जल्लोषात रॅली काढली.

जळगाव, 7 एप्रिल: महावितरण अधीक्षक अभियंत्याला खुर्चीवर दोरीने बांधल्याप्रकरणी अटकेत असलेले चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांची 12 दिवसानंतर जामिनावर सुटका झाली. आमदार चव्हाण यांच्या सुटकेनंतर मध्यवर्ती कारागृहाबाहेर त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करत जल्लोषात रॅली काढली. यावेळी कोरोनाचे (Coronavirus) सर्व नियम धाब्यावर बसवत प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांना वेगळा न्याय व लोकप्रतिनिधींना वेगळा न्याय का? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांच्या वीज समस्येबाबत चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव येथील महावितरण अभियंत्याला दोरीने खुर्चीला बांधून चपलेचा हार घातला होता. या प्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. 12 दिवसानंतर मंगेश चव्हाण यांची जामिनावर सुटका झाली.

त्यांच्या सुटकेनंतर जळगाव मध्यवर्ती कारागृह बाहेर त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंगेश चव्हाण यांचे जल्लोषात स्वागत केले. एवढेच नाही तर चाळीसगाव येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रात्री उशिरापर्यंत ढोल-ताशे वाजवत ट्रॅक्टरवर रॅली काढून जल्लोष साजरा करण्यात आला.

हेही वाचा - राज्यभरातील कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं स्पष्टीकरण

यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनीदेखील मास्क लावलेला नसल्याने मंगेश चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

एकीकडे, राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक केल्यानंतर सर्वसामान्यांवर नियम मोडल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे सर्वसामान्यांना वेगळा न्याय व लोकप्रतिनिधींना वेगळा न्याय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

First published:

Tags: Coronavirus, Jalgaon, Mla, Rules violation