Home /News /maharashtra /

माझ्यावर गुन्हे दाखल झाले ते षडयंत्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर गणेश नाईक यांची पहिली प्रतिक्रिया

माझ्यावर गुन्हे दाखल झाले ते षडयंत्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर गणेश नाईक यांची पहिली प्रतिक्रिया

महिला अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे (BJP MLA Ganesh Naik) ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेश नाईक प्रथमच जाहीररीत्या बाहेर पडले. माझ्यावर गुन्हे दाखल झाले ते षडयंत्र आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पुढे वाचा ...
  नवी मुंबई, 11 मे : महिला अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे (BJP MLA Ganesh Naik) ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेश नाईक प्रथमच जाहीररीत्या बाहेर पडले. माझ्यावर गुन्हे दाखल झाले ते षडयंत्र आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. बलात्कार, जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यांनंतर नाईक अज्ञातस्थळी होते. काही जणांना राजकारणात योग्य ते स्थान मिळालं नसल्याने हे षडयंत्र केलं गेलंय असा आरोप त्यांनी केला आहे. काय म्हणाले गणेश नाईक - विरोधी राजकीय पक्षांनी हे षडयंत्र केलं आहे. न्यायालयाने मला सूट दिली आहे. पण काही अटी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात मी माझ्यावर लावण्यात आलेल्या गुन्ह्यांवर सविस्तर बोलणार आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रथमच गणेश नाईकांनी आपली प्रतिक्रिया दिली. नाईक अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर प्रथमच मनपा आयुक्तांच्या भेटीला आले होते. यावेळी ते बोलत होते. नुकताच मिळाला जामीन - आमदार गणेश नाईक यांना दिलासा मिळाला आहे. गणेश नाईक यांना जामीन मंजूर (Granted bail) करण्यात आला आहे. बलात्काराचा गुन्हा (Rape Case) दाखल झाल्यानंतर गणेश नाईक यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश नाईक यांना अटक पूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. 25 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना मंजूर केला. यावेळी त्यांना तपास कामात पोलिसांना सहकार्य करायचं आणि बाहेर जाण्याआधी पोलिसांना कळवायचे अशा सूचना न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत. नेमकं प्रकरण काय? भाजपचे नेते गणेश नाईक यांच्यावर एका महिलेनं लिव्ह इन रिलेशनशिपचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. आता ही पीडित महिला समोर आली असून आमची डीएनए चाचणी करावी, कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नाही, माझ्या मुलाला वडिलांचे नाव मिळावे, अशी मागणी पीडितेनं केली आहे. हेही वाचा - Raj Thackeray यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन भाजपत मतभेद, एका खासदाराचा विरोध तर दुसऱ्याने केली स्वागताची तयारी
  'माझ्यावर अत्याचार झालाय, माझं शोषण झालंय, मला टॉर्चर केलं गेलंय' अशी उद्विग्न प्रतिक्रिया गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने व्यक्त केली आहे. डीएनए टेस्ट केल्याशिवाय याचा निर्णय लागू शकत नाही. त्यामुळे आमची डीएनए टेस्ट करावी. जिथे जिथे मला मदत भेटेल तिथे तिथे मी जाणार असून मला कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नसल्याचेही पीडित महिलेनं स्पष्ट केलं.
  'आमच्यावर सुरुवातीपासून भेदभाव होत आलाय, कुठेही आमचा स्वीकार केला गेला नाही, आम्हाला लपवून ठेवलं गेलं. नाईकांची माझ्या मुला विषयी कोणतीही प्रेमाची भावना देखील नाही. अशी प्रतिक्रिया देखील पीडित महिलेने व्यक्त केलीय. यासोबतच मला पैश्याचा मोह नसून फक्त मुलाला वडिलांचे नाव मिळावं हीच अपेक्षा असल्याचे या महिलेनं स्पष्ट केलंय.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: BJP, Ganesh naik, Woman harasment

  पुढील बातम्या