वरूड, 16 मे : वरुड तालुक्यातील एका 14 वर्षीय मुलीचा मध्यप्रदेशात बालविवाह (Child Marriage) करण्यात आला होता. मात्र, तिच्या पतीनेच तिच्यासोबत शारीरिक बळजबरी करत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Husband Rape after Child Marriage) याप्रकरणी, पोलिसांनी 14 मे रोजी पीडित मुलीचे बळजबरीने लग्न लावून देणाऱ्या आईसह, पती, सासू, मामा, आणि मध्यस्थी करणाऱ्यांसह एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान अन्वये कलम 376 (3), 34, पॉस्को, बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं -
वरुड तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय मुलीचा मध्यप्रदेशातील जुन्नारदेव तालुक्यात बालविवाह करण्यात आला होता. 14 वर्षीय मुलीची आई आणि तिचा मामा या दोघांनी डिसेंबर 2021 मध्ये बळजबरीने हा विवाह लावला होता. यानंतर त्या मुलीसोबत पतीने बळजबरीने शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. इतकेच नव्हे तर तिच्यावर बलात्कारही करण्यात आला. ही संपूर्ण घटना एप्रिल 2021 ते 12 मे 2022 दरम्यान घडली.
हेही वाचा - पॉर्न दाखवत केले 13 वर्षीय नातीचे लैंगिक शोषण, न्यायालयाने दिला 'हा' निकाल
सासरी त्या मुलीवर अत्याचार करण्यात आले. त्यामुळे ती कंटाळून माहेरी आली. मात्र, इथे अनपेक्षित असा प्रकार घडला. नवऱ्याकडे का जात नाही म्हणून तिला माहेरीही मारहाण करण्यात आली. शेवटी यासंपूर्ण प्रकाराला कंटाळून तिने 22 एप्रिलला वरुड पोलीस ठाणे गाठले. तसेच घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी प्रकरणाशी शहानिशा केली.
याप्रकरणी 14 मे रोजी पीडित मुलीचे बळजबरीने लग्न लावून देणाऱ्या आईसह, पती, सासू, मामा, आणि मध्यस्थी करणाऱ्यांसह एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान अन्वये कलम 376 (3), 34, पॉस्को, बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati, Madhya pradesh, Rape news, Rape on minor