मुंबई, 16 मे : समाजात वडिलधाऱ्यांचा आदर केला जातो. ही परंपरा राहिली आहे. मात्र, मुंबईत (Mumbai) एक वृद्धानेच एक संतापजनक प्रकार केला आहे. मुंबईत एका 70 वर्षीय वृद्धाने त्याच्या सावत्र 13 वर्षाच्या नातीचे लैंगिक शोषण केले व पॉर्न व्हिडिओ मोबाईलवर दाखवले. (Sexual Abused on Step Grand daughter) 2014 मध्ये ही घटना घडली होती. त्यामुळे न्यायालयाने या 70 वर्षीय वृद्धाला सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. काय केले होते वृद्ध आरोपीने - पीडित मुलीची आई सप्टेंबर 2014 मध्ये ती काही कामानिमित्त बाहेर गेली होती. यानंतर जेव्हा ती परत आली, तेव्हा त्या महिलेचा सावत्र बाप तिच्या मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळला. तसेच त्याने या मुलीला फोनवर काही अश्लिल व्हिडिओही दाखवले. त्याची मुलगी त्याला पाहत असल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर आरोपी सावत्र बाप मुलीला सोडून निघून गेला होता. यानंतर संशय आल्यामुळे महिलेने मुलीला विचारणा केली. तर तिने सांगितले की, तिचा सावत्र आजोबा तिचे लैंगिक शोषण करत असे आणि मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवत असे. यानंतर पीडित मुलीच्या आई म्हणजेच आरोपीच्या सावत्र मुलीने आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. याच्यावर न्यायालयाने निकाल दिला. आरोपीने काय म्हटले? तर दुसरीकडे, त्यांच्या सावत्र मुलीने 25 हजार रुपये मागितले होते ते त्यांनी दिले नाहीत. म्हणून कौटुंबिक वादामुळे त्यांच्याविरुद्धचा खटला दाखल केला गेला, असा बचाव आरोपींच्या बाजूने केला गेला. मात्र, अनेक साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे तपासण्यात आले. तसेच न्यायालयाने वैद्यकीय अहवालही तपासला. यात मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. न्यायाधीश शेंडे यांनी मुलीने लैंगिक अत्याचाराबाबत यापूर्वी का सांगितले नाही, या मुद्द्यावर लक्ष वेधले असता, पीडितेची वैद्यकीय चाचणी हा सबळ पुरावा असल्याचे सांगितले. त्याने आधी खुलासा न केल्यामुळे त्याची साक्ष नाकारण्याचे कारण नाही. अशा हल्ल्यांना बळी पडून वर्षानुवर्षे गप्प बसणे ही आपल्या समाजात नवीन गोष्ट नाही. हेही वाचा - पत्नीने 50 हजारांत दिली पतीची सुपारी; प्रियकर आणि मुलानेही केली मदत
न्यायालय काय म्हणाले?
‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित गुन्ह्यातीला आरोपीला पुरेशी शिक्षा दिली पाहिजे. बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार हा केवळ सर्वच महिलांविरुद्धचा गुन्हा नाही, तर समाजाविरुद्धही हा गंभीर गुन्हा आहे, असे न्यायालयाने म्हटले. ‘या प्रकरणातील पीडितेचे म्हणणे आहे की, जर तिने याबाबत कोणाला सांगितले तर तो तिच्या आई-वडिलांना मारून टाकेल, असे सांगून आरोपीने तिला धमकी दिली होती. त्यामुळे तिच्यावर दबाव आणला गेला. त्यामुळे न्यायालयाने या 70 वर्षीय वृद्धाला सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे.