मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

साताऱ्यात अल्पवयीन मुलीसोबत विकृत कृत्य, ब्लॅकमेल करत सुरू होता धक्कादायक प्रकार

साताऱ्यात अल्पवयीन मुलीसोबत विकृत कृत्य, ब्लॅकमेल करत सुरू होता धक्कादायक प्रकार

 मुलगी घरी एकटीच असताना तो घरात शिरला. त्याने बॉटलमधून आणलेले पाणी तिला पाजले. त्यानंतर चक्कर येऊन तिला झोप आली.

मुलगी घरी एकटीच असताना तो घरात शिरला. त्याने बॉटलमधून आणलेले पाणी तिला पाजले. त्यानंतर चक्कर येऊन तिला झोप आली.

Minor Girl Rape in Satara: साताऱ्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेण्याऱ्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार (Blackmail and rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk

सातारा, 15 जानेवारी: साताऱ्यातील (Satara) एका महाविद्यालयात शिक्षण घेण्याऱ्या अल्पवयीन मुलीला (Minor college student) ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार (Blackmail and rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं पीडित मुलीला तिच्या मैत्रिणीच्या नावानं चॅटींग (Chatting as victim's female friend) करत तिला जाळ्यात अडकवलं होतं. त्यानंतर तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आहे. नराधम आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने सातारा तालुका पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) करत आरोपीला ताब्यात  (Accused arrested) घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

आरोपी तरुण हा कोरागाव तालुक्यातील रहिवासी असून तो पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या मामाच्या घराशेजारी राहतो. आरोपी युवकानं पीडित मुलीची मैत्रीण बोलतेय असं भासवून सर्वप्रथम तिच्याशी चॅटींग केली होती. तसेच आपली मैत्रीणचं आपल्याशी बोलतेय असं समजून पीडित अल्पवयीन मुलगी देखील आरोपीशी बिंदास्तपणे संवाद करत होती. दरम्यान अलीकडेच आपण ज्याच्याशी चॅटींग करतोय, ती आपली मैत्रीण नसून वेगळाच मुलगा असल्याचं तिला समजलं.

हेही वाचा-हातावर पोट असणाऱ्या जोडप्यानं गमावलं लेकरू, 2 वेळच्या अन्नासाठी झगडताना झाला अंत

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपीनं पीडित मुलीवर दबाव टाकून तिला प्रेमसंबंधाचे मेसेज करायला लावले. त्यानंतर आरोपीनं तिच्याशी जवळीक साध तिला साताऱ्यातील राजवाड्याजवळील बस स्थानकात बोलावलं. पीडित मुलगी याठिकाणी गेली असता,आरोपीनं तिला दुचाकीवर बसवून शाहूपुरी परिसरातील एका खोलीत नेलं. या ठिकाणी नराधमाने ‘तुझे रेकॉर्ड केलेले कॉल तुझ्या घरच्यांना दाखवीन’, अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.

हेही वाचा-चिमुकल्याला घेऊन घराबाहेर पडली अन् घडलं विपरीत; नाल्यात आढळले मायलेकाचे मृतदेह

या धक्कादायक प्रकारानंतर पीडित मुलीनं बदनामी होईल म्हणून आरोपीचा त्रास निमूटपणे सहन केला. त्यानंतर आरोपीनं ब्लॅकमेल करत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीनं सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कोरेगाव तालुक्यातील आरोपी तरुणाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Rape on minor, Satara