जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शरद पवार यांची भेट बारसु संदर्भात नव्हे तर...; मंत्री उदय सामंत यांनी केला खुलासा

शरद पवार यांची भेट बारसु संदर्भात नव्हे तर...; मंत्री उदय सामंत यांनी केला खुलासा

शरद पवार यांची भेट बारसु संदर्भात नव्हे तर...; मंत्री उदय सामंत यांनी केला खुलासा

उदय सामंत आजारी पडल्याची आणि भेट रद्द झाल्याचीही चर्चा होती पण तसं काही नसल्याचं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 एप्रिल : मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर इथं भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना उदय सामंत यांनी भेटीच्या कारणाबद्दल माहिती दिली. राजापूर रिफायनरीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याची चर्चा होती. दरम्यान, उदय सामंत यांनी हे दावे फेटाळून लावले. उदय सामंत आजारी पडल्याची आणि भेट रद्द झाल्याचीही चर्चा होती पण तसं काही नसल्याचं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. आमच्या मनातलं कोण सांगतं माहिती नाही. पण आमची भेट बारसु संदर्भात नाही. अखिल भारतीय नाट्य परिषदेमधील ही भेट होती. काल मला त्यांचा फोन आला होता, मुख्यमंत्री यांच्यासोबत देखील मी चर्चा करणार आहे असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा एका महिन्यात दुसरा महाराष्ट्र दौरा, मुख्यमंत्री शिंदे स्वागताला जाणार   संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले की, त्यांच्यावर विश्वास न ठेवता बारसुला आलं पाहिजे. प्रकल्प होणार की नाही हे ठरणार आहे. पंतप्रधान यांना पत्र लिहिणं, पर्यावरण संदर्भात लिहिणं हे सगळं झालं. त्यांनी आम्हाला सल्ला दिला नाही पाहिजे. जर माझ्या अखत्यारित एअर बस बाहेर गेला हे कळालं तर मग मी राजीनामा देईन. मुख्यमंत्री सातारा दौऱ्यावर गेल्यानंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. याबाबत बोलताना उदय सामंत यांनी म्हटलं की, ‘ते संपर्कात आहेत. उगाच कोणीतरी भांडवल करू नये.’ मुख्यमंत्री शिंदे आज सायंकाळी नागपूरला केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी जाणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात