मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अनिल परब यांची मोठी घोषणा, एसटी कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात थेट 5 हजारांनी वाढ

अनिल परब यांची मोठी घोषणा, एसटी कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात थेट 5 हजारांनी वाढ

राज्य सरकारने पहिल्यांदाच एसटीच्या पहिल्या कॅटेगिरीतील कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात तब्बल 5 हजार रुपयांची वाढ केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली आहे.

राज्य सरकारने पहिल्यांदाच एसटीच्या पहिल्या कॅटेगिरीतील कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात तब्बल 5 हजार रुपयांची वाढ केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली आहे.

राज्य सरकारने पहिल्यांदाच एसटीच्या पहिल्या कॅटेगिरीतील कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात तब्बल 5 हजार रुपयांची वाढ केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली आहे.

  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 24 नोव्हेंबर : राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने पहिल्यांदाच एसटीच्या पहिल्या कॅटेगिरीतील कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात तब्बल 5 हजार रुपयांची वाढ केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा यासाठी कालपासून घडामोडींना वेग आला आहे. परिवहन मंत्री यांची काल संध्याकाळी एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली. त्यानंतर आज सकाळी दोन सत्रात बैठक झाली. या बैठकीत पगारवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवण्यात आला होता. या शिष्टमंडळात आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्यासह संपकरी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पगारवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर अनिल परब यांनी पगारवाढीची घोषणा केली. या पगारवाढीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर दर महिन्याला 50 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार वाढणार असल्याची माहिती परब यांनी दिली.

अनिल परब नेमकं काय म्हणाले?

जे कर्मचारी सेवेत एक वर्ष ते दहा वर्ष या कॅटेगिरीत आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट 5 हजार रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचं मुळ वेतन 12 हजार 80 रुपये होतं त्याचं आता 17 हजार 395 जालं आहे. त्याचं पूर्ण वेतन 17 हजार 395 होतं ते आता 24 हजार 694 झालं आहे. म्हणजे 7 हजार 200 रुपयांची वाढ पहिल्या कॅटेगिरीच्या कर्मचाऱ्यांसाठी केली आहे. पहिल्या कॅटेगिरीतील कर्मचाऱ्यांमध्ये पगाराबाबत नाराजी होती. त्यांचा आक्रोश गेल्या काही दिवसांमध्ये दिसला. त्यामुळे त्यांच्या पगारात फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या पगारवाढीपैकी ही एक मोठी वाढ आहे. जवळपास 41 टक्के ही पगारवाढ करण्यात आली आहे.

10 ते 20 वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात आम्ही 4 हजारांची वाढ केली आहे. त्यामुळे ज्यांचं मुळ वेतन 16 हजार होतं. त्यांचा पगार मुळ वेतनाच्या 23 हजार 40 रुपये आहे. आता वाढ केल्यानंतर त्यांचा पगार 28 हजार 800 इतका झाला आहे.

20 वर्ष आणि त्याहून अधिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात 2500 रुपयांनी वाढ केली आहे. ज्याचं स्थूल वेतन 37 हजार 440 होतं त्याचं वेतन आता 41 हजार 40 झालेलं आहे. ज्याचं स्थूलवेतन 53 हजार 280 होतं त्याचं वेतन 56 हजार 880 होईल.

प्रत्येक कर्मचाऱ्याचा पगार प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या आत होईल, याची हमी देतो.

गेले 15 दिवस एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप चालू होता. या संपात कर्मचाऱ्यांची एकच प्रमुख मागणी होती, ती म्हणजे महामंळाच्या कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं. याबाबत आम्ही आमची भूमिका वेगवेगळ्या स्तरावर मांडत होतो. उच्च न्यायालयात ज्यावेळी विषय गेला त्यावेळी उच्च न्यायालयाने त्रिस्तरस्तीय समिती बनवली आहे. या समितीला 12 आठवड्यात विलीनीकरणाबाबत अहवाल मु्ख्यमंत्र्यांकडे द्यावा. नंतर मुख्यमंत्र्यांचे म्हणणं त्याला जोडून मग तो अहवाल हायकोर्टात अहवाल जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मागणी हायकोर्टाच्या समितीच्या अहवालावर अवलंबून आहे. समितीच्या अहवालात जे काही असेल तो निर्णय आम्ही घेऊ.

हा संप दिवसेंदिवस लांबत चालला होता. समितीचा अहवाल यायला बराच वेळ आहे. अशा परिस्थितीत काय करावं याबाबत आम्ही विचार करत होतो. आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाचं काम केलं. आम्ही सरकारतर्फे एक प्रस्ताव ठेवला, विलीनीकरणाचा निर्णय समितीने राज्य सरकरला दिला तो आम्हाला मान्य असेल पण तो निर्णय होईपर्यंत हा तिढा असाच कायम ठेवता येणार नाही. म्हणून सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ कर्मचाऱ्यांच्या मुळ पगारात केला जाणार आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जो डीए आहे तोच डीए एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. घरभाडेचा भत्ताही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे दिला जातो. पगारवाढीबबत आम्ही निर्णय घेणार होतो.

First published: