जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Monsoon Update : मान्सूनबाबत हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, राज्यात लवकरच धो-धो पाऊस!

Monsoon Update : मान्सूनबाबत हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, राज्यात लवकरच धो-धो पाऊस!

मान्सून

मान्सून

मान्सूनबाबत हवामान खात्याकडून नवी अपडेट जारी करण्यात आली आहे.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 14 जून : मान्सूनबाबत हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. राज्यात येत्या 23 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होईल असा अंदाज पुणे वेधशाळेचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यातील मान्सूनची वाटचाल रखडली होती. मात्र आता अरबी समुद्रात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होताना दिसत आहे, त्यामुळे मान्सून पुन्हा एकदा सक्रीय होणार असल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे. दरम्यान बिपरजॉय हे चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत कच्छ आणि कराची किनारपट्टीवर आदळेल, असा अंदाजही पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. स्कायमेटचा अंदाज   दरम्यान दुसरीकडे मात्र स्कायमेट या खासगी संस्थेकडून थोडा चिंताजनक अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या चार आठवड्यात देशात पावसाचं प्रमाण कमी राहील असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे. पाऊस वेळेवर व पुरेसा न पडल्यास पेरणीला उशिर होऊ शकतो. पुढील चार आठवडे म्हणजेच 6 जुलैपर्यंत देशभरात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल असा अंदाज स्काटमेट कडून वर्तवण्यात आला आहे. बिपरजॉयमुळे अडथळा   यंदा मान्सून उशिरानं केरळमध्ये दाखल झाला. मान्सूनला केरळमध्ये पोहोचण्यासाठी यावर्षी एक आठवडा उशिर झाला आहे. त्यातच आता बिपरजॉय चक्रिवादळामुळे मान्सूनची गती मंदावली आहे. महाराष्ट्रात रविवारी तळ कोकणात मान्सून दाखल झाला. मात्र बिपरजॉय वादळामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. बिपरजॉय चक्रिवादळामुळे मान्सूनची गती मंदावली असून, जसा जसा चक्रीवादळाचा प्रभाव कमी होईल तसा-तसा मान्सून राज्यभरात सक्रीय होईल असं भारतीय हवामान खात्यानं मंगळवारी म्हटलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात