जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिक्षणासाठी 1900 किलोमीटर आला दूर पण, डॉक्टर होण्याचं स्वप्न राहिलं अधूरच; त्यापूर्वीच मृत्यू

शिक्षणासाठी 1900 किलोमीटर आला दूर पण, डॉक्टर होण्याचं स्वप्न राहिलं अधूरच; त्यापूर्वीच मृत्यू

आत्महत्या केलेला विद्यार्थी (काळा शर्ट)

आत्महत्या केलेला विद्यार्थी (काळा शर्ट)

सिंधुदुर्गमधील घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Sindhudurg,Maharashtra
  • Last Updated :

विशाल रेवडेकर, प्रतिनिधी सिंधुदुर्ग, 27 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून हत्या, बलात्कार तर नैराश्यातून आत्महत्येच्याही घटनांमध्ये वाढ होत आहे. आयआयटी मुंबईच्या एका विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्यानेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. या महाविद्यालयात एका विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यात खळबळ माजली आहे. वैद्यकीय विद्यालयाच्या वस्तीगृहातील एका खोलीत फॅनला फास लावून द्वितीय वर्षात शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले. आज सकाळी सकाळीच ही घटना उघडकीस आली. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आशिष गेहालयान (19) याने सोमवारी पहाटे तो राहत असलेल्या वसतिगृह इमारतीच्या एका खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. तो मूळचा कर्नाल, हरियाणा येथील रहिवासी आहे.  आशिष हा मागील वर्षभरापासून वसतिगृहात राहत होता. सध्या पहिल्या वर्षाची प्रॅक्टिकल सुरू आहेत. परीक्षेला सामोरे जात असतानाच त्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्याने आत्महत्या का केली, याबाबतचे कारण स्पष्ट झाले नसून पोलीस निरीक्षक हेमंत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आई जेवणासाठी आवाज देत राहिली अन…, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आयआयटी मुंबई येथे केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या दर्शन सोलंकी (18) या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. वसतिगृह इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत त्याने आपले जीवन संपवले होते.

दर्शन सोलंकी हा मूळचा अहमदाबादचा राहणारा होता. मग मागील तीन महिन्यांपूर्वी तो मुंबईतील पवई आयआयटीमध्ये आला होता. या घटनेनंतर आता सिंधुदुर्गमधील घटनेने खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात