मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आई जेवणासाठी आवाज देत राहिली अन..., सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना

आई जेवणासाठी आवाज देत राहिली अन..., सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना

आत्महत्या केलेला तरुण

आत्महत्या केलेला तरुण

सिल्लोड तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India

अविनाश कानडजे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 26 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातून उघडकीस आली आहे. आई जेवणासाठी आवाज देत राहिली आणि दुसरीकडे एका तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

आई जेवणासाठी आवाज देत राहिली आणि दुसरीकडे त्याने गळफास घेऊन जीवन संपवले. सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथे ही धक्कादायक घटना घडली. अफजल आबास तडवी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

एका 23 वर्षीय युवकाने वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथे घडली. अफजल आबास तडवी हा तरुण सकाळी जनावरे चारण्यासाठी शेतात गेला होता. त्यानंतर आई आपल्या मुलाचा जेवणाचा डबा घेऊन शेतावर गेली. त्यावेळेस आईने त्याच्या नावाने जोरजोरात आवाज दिले. मात्र, त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही.

बस स्थानकावर रोड रोमिओचे विकृत कृत्य, लोकांनी धू धू धुतले

त्यामुळे आईने झाडाखाली जाऊन पाहिले असता अफजल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. याप्रकरणी अजिंठा पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला असुन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसुन पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. राज्यातील तरुणांच्या वाढत्या आत्महत्येच्या घटना या चिंतेची बाब ठरत आहेत.

First published:
top videos

    Tags: Aurangabad News, Death