मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तुका म्हणे धावा, आता पंढरी विसावा !

तुका म्हणे धावा, आता पंढरी विसावा !

पंढरीच्या वाटेवरचा पालखी सोहळा आता शेवटच्या टप्प्यात जाऊन पोहोचलाय. माऊलींच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण आज ठाकूरबुवाच्या  समाधीजवळ संपन्न झालं.

1 जुलै : पंढरीच्या वाटेवरचा पालखी सोहळा आता शेवटच्या टप्प्यात जाऊन पोहोचलाय. माऊलींच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण आज ठाकूरबुवाच्या  समाधीजवळ संपन्न झालं. तर जगतगुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज तोंडले बोंडलेच्या टेकडीवर लाडक्या विठुरायाचा धावा बोलतोय.

तुका म्हणे धावा, आता पंढरी हाच विसावा या अभंगाप्रमाणे सर्व वारकऱ्यांना लाडक्या विठुरायाची आस लागलीय. भंडी शेगावला बंधू भेटीचा सोहळा पार पडणार आहे. सोपानदेव आणि माऊलीच्या पालखीची बंधूभेट याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो वारकरी भंडी शेगावात एकत्र जमतात. तुकोबांची पालखी आज पिराची कुरोलीत मुक्कामी असणार आहे तर माऊलींची पालखी भंडी शेगावच्या मुक्कामी पोहोचतेय उद्या या दोन्ही पालख्या वाखरी मुक्कामी असणार आहेत.

वाखरीत शेवटचं आणि सर्वात मोठं गोलं रिंगण आणि शेवटचं उभं रिंगण पार पडतं. हा सोहळा नयनरम्य असाच असतो त्यानंतरच हे दोन्ही पालखी सोहळे पंढरी नगरीत दाखल होतात तर इतर दिंड्या आपापल्या मुक्कामी पोहोचतात.

First published:

Tags: Viththal, Wari, वारी