भावाने दिला भावाला मुखाग्नी, शहीद जवान यश देशमुख अनंतात विलीन

भावाने दिला भावाला मुखाग्नी, शहीद जवान यश देशमुख अनंतात विलीन

एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले यश देशमुख हे मागच्या वर्षीच सैन्यात भरती झाले होते. चार महिन्यांपूर्वी श्रीनगर येथे मराठा बटालियन 101 रेजिमेंटमध्ये नियुक्ती करण्यात आली होती.

  • Share this:

जळगाव, 28 नोव्हेंबर : जम्मू काश्मिर (Jammu-Kashmir) श्रीनगर येथे झालेल्या दहशतवादी जळगावचे जवान यश दिगंबर देशमुख (Yash Digambar Deshmukh) शहीद झाले होते. आज त्यांच्या मुळगावी साश्रू नययांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यश देशमुख यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावच्या या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाया एकवटला होता.

जम्मू काश्मिरमधील श्रीनगर इथं 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगावचे जवान यश दिगंबर देशमुख हे शहीद झाले होते. त्यांचं पार्थिव आज सकाळी औरंगाबाद मार्गे मुळगावी आणण्यात आले.

यश देशमुख यांचं पार्थिव मुळगावी दाखल झाल्यानंतर अंत्यदर्शनसाठी मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी गर्दी केली होती.  या ठिकाणी मोठ्या संख्येने जिल्हाभरातून अनेक नागरिक शहीद जवानाला अखेरचा सलाम देण्यासाठी उपस्थित झालेले होते. यावेळी जमलेल्या जमावाने पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आणि 'यश देशमुख अमर रहे' अशा घोषणा दिल्यात.  यश देशमुख यांचा लहान भाऊ मयुर देशमुख याने आपल्या शहीद भावाच्या पार्थिवाला अग्निडाग दिला.

एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले यश देशमुख हे  मागच्या वर्षीच सैन्यात भरती झाले होते. चार महिन्यांपूर्वी श्रीनगर येथे मराठा बटालियन 101 रेजिमेंटमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. 26 नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत यश देशमुख यांनी वीरमरण आले.

यश देशमुख यांच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असं कुटुंब आहे.

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात ऐन दिवाळीच्या सणात महाराष्ट्रातील आणखी दोन तरुण जवानांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आहे. जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर आणि गुरेझ सेक्टर शुक्रवारी 13 नोव्हेंबर रोजी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला होता. या गोळीबारात भारताचे 5 जवान शहीद झाले होते. तर 3 नागरिक ठार झाले होते. यामध्ये महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण आले. कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी गावाचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील अंबाडा सोनक गावातील भूषण सतई शहीद झाले. या दोन्ही जवानांवर त्यांच्या मुळगावी साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Published by: sachin Salve
First published: November 28, 2020, 1:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading