अवघ्या 29 तासांतच काळाने हिरावून घेतलं चिमुकल्यावरील मातृछत्र

अवघ्या 29 तासांतच काळाने हिरावून घेतलं चिमुकल्यावरील मातृछत्र

डॉक्टरानी नैसर्गिक प्रसुती होत नसल्यामुळे सिझेरिनचा निर्णय घेतला. यावेळी अश्विनीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर अवघ्या चार ते पाच तासांनी तिच्या...

  • Share this:

बीड, 18 सप्टेंबर: बीड जिल्हा रुग्णालयात सिझेरिन प्रसुती झालेल्या मातेवर मृत्यू ओढवल्याने अवघ्या 29 तासांतच चिमुकल्याचं मातृ छत्र काळाने हिरावून घेतलं आहे. नवजात बालक सुखरूप आहे. नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. बीड तालुक्यातील नागझरी येथील अश्विनी विष्णू कळसुले (वय-24) असे मृत महिलेचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी अश्विनीला प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या. नंतर तिला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरानी नैसर्गिक प्रसूती होत नसल्यामुळे सिझेरिनचा निर्णय घेतला. यावेळी अश्विनीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर अवघ्या चार ते पाच तासांनी तिच्या छातीत दुखायला सुरूवात झाली. नातेवाईकांनी डॉक्टरांना कळविले. उपचारही करण्यात आले. मात्र, त्यानंतर हा त्रास कमी झालाच नाही. यातच अश्विनीला आयसीयूमध्ये उपचार सुरू होते, मात्र, अवघ्या 29 तासांतच अश्विनीची प्राणज्योत मालवली. यावेळी नातेवाईकांनी रूग्णालय परिसरात टाहो फोडला.

दरम्यान, अश्विनीच्या छातीत दुखत असल्याबाबत वारंवार येथील नर्स आणि डॉक्टरांना सांगितले होते. मात्र, त्यांनी उपचाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. उपचारात हलगर्जी आणि वेळेवर उपलब्ध न होणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

अश्विनी आणि विष्णू यांचे 7 मे 2018 रोजी लग्न झाले होते. अश्विनी गरोदर राहिल्यावर उखंडा येथे माहेरी आल्या. त्यांची प्रसूती झाल्यावर कळसुले कुटुंब आनंदी होते. मात्र, हा आनंद काही क्षणापुरताच होता.अश्विनी यांनी एका चिमुकल्याला जन्म दिला आहे. सध्या हे बाळ नातेवाईकांकडे आहे. त्याला गायीचे दूध पाजले जात आहे. सध्या त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

Special Report:'पवारसाहेब भाकरी फिरली कुठे?'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2019 10:05 PM IST

ताज्या बातम्या