लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का, कॉंग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे झाले महापौर

लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का, कॉंग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे झाले महापौर

भाजपच्या दोन नगरसेवकांनी काँग्रेसला मतदान केल्याने सत्ताधारी भाजपवर पराभवाची नामुष्की ओढवली

  • Share this:

लातूर,22 नोव्हेंबर:लातूर महानगरपालिकेत भाजपला मोठा धक्का बसला आहे. बहुमतात असतानाही ताब्यात असलेले महापौर पद भाजपला गमवावे लागले आहे. महापौरपदी कॉंग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांची निवड झाली आहे. विक्रांत गोजमगुंडे यांनी भाजपचे शैलेश गोजमगुंडे यांचा पराभव केला.

भाजपचे नगरसेवक फुटले...

भाजपच्या दोन नगरसेवकांनी काँग्रेसला मतदान केल्याने सत्ताधारी भाजपवर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. लातूर महानगरपालिकेत भाजप-35, कॉंग्रेस- 33 आणि राष्ट्रवादी-01 असे होते पक्षीय बालाबल आहे. दरम्यान, अडीच वर्षातच महापालिकेत सत्तांत्तर झाले. महापौर निवडीच्या बैठकीत काँग्रेसचा एक नगरसेवर अनुपस्थित होता. तर भाजपच्या एका सदस्याचे निधन झाले आहे. त्यामुळे एकून 68 सदस्यांनी हात उंच करून मतदान केले. विक्रांत गोजमगुंडे यांना 35 मते मिळाली. महापालिकेबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून मोठा जल्लोष केला.

नाशकात भाजपचा महापौर.. महाविकासआघाडीला धक्का

दरम्यान,राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकासआघाडीचे समीकरण जुळत असताना नाशकात महापौर, उपमहापौर निवडणुकीत महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना, भाजप नगरसेवक फोडणाऱ्या बाळासाहेब सानप यांनी ऐनवेळी तलवार म्यान करत माघार घेतल्याने नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी यांची तर भीखुबाई बागुल यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी महापौरांच्या नावाची ऑनलाइन घोषणा केली.

मनसेच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर

नाशिक महापालिका महापौर, उपमहापौर पदीची निवडणूक राज्यातील नव्या सत्ता समीकरणाची नांदी समजली जात आहे. महापालिका निवडणूक अखेरचे तास रंगतदार ठरला. महाविकासआघाडीला मतदानापूर्वीच फटका बसला. काँग्रेसचे नगरसेवक ऐनवेळी महाविकासआघाडीतून बाहेर पडले. त्यामुळे भाजपची दावेदारी मजबूत झाली. राष्ट्रवादीचे नगरसेवकही शेवटपर्यंत तळ्यात मळ्यात होते. भाजपवरील संकट घालवण्यासाठी भाजपचे 'संकटमोचन' नेते गिरीश महाजन यांनी अथक परिश्रम घेतल्याचे बोलले जात आहे. नाशकात मनसेच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर निवडून आला आहे. मनसेच्या पाचही नगरसेवकांनी भाजपला साथ दिली.

भाजपचे फुटीरांचे बंड झालं थंड..

सत्ताधारी भाजपच्या 10 नगरसेवकांना या महाविकासआघाडीने आपल्या तंबूत घेऊन धक्का देण्यासाठी रणनीती आखली होती. दुसरीकडे सत्ता राखण्यासाठी भाजपने मनसेसोबत घरोबा केला. भाजपमधून फुटलेले सर्व नगरसेवक पुन्हा भाजपात परत आले आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांची सहल, मोठा घोडेबाजार, नगरसेवकांची पळवापळवी अशा नाट्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आणली होती. शुक्रवाकी अखेर या नाट्याच्या तिसरा अर्थात अखेरचा अंक पाहायला मिळणार आहे. एकंदरीत राज्यात होणाऱ्या महाविकासआघाडीच्या प्रयोगाची ही ट्रायल मानली जात आहे.

Tags:
First Published: Nov 22, 2019 01:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading