कोरोनाव्हायरसचं संकट एवढ्यात संपणारं नाही, हे आता लक्षात आलं आहे आणि कोरोनासोबत जगण्याचे उपाय लोक शोधू लागले आहेत.
सर्वाधिक संपर्काचा आणि संसर्गाचा धोका म्हणून सलॉन सर्वात आधी बंद झाले. पण आता केस कापण्यासाठी सलॉंवाल्यांनीही अशी PPE किट परिधान केली आहे.
गुजरातमधल्या नाडियाद इथे एका सलाँनने असं पूर्ण आयुधांनिशी तयार होऊन काम सुरू केलं आहे.
इथे येणार्या ग्राहकांना मास्क वापरण बंधनकारक आहे आणि केस कापणारेही स्वतः पीपीई किट घालून स्वतःचं रक्षण करत आहेत.
गुजरातमधल्या 27 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
13 मे या एकाच दिवशी गुजरातमध्ये 362 रुग्ण सापडले आहेत. हे प्रमाण दररोज वाढत आहे.
आतापर्यंत गुजरातमध्ये 8,903 कोरोनारुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 3,246 रुग्ण बरे झाले आहेत. तर 537 जणांचा जीव कोरोनाव्हायरसमुळे गेला आहे.