मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यातील मोठ्या GST घोटाळ्यात आमदाराच्या मुलाला अटक; तब्बल 520 कोटी रुपयांच्या बनावटी बिलांचं प्रकरण

राज्यातील मोठ्या GST घोटाळ्यात आमदाराच्या मुलाला अटक; तब्बल 520 कोटी रुपयांच्या बनावटी बिलांचं प्रकरण

थोड्याच वेळात जीएसटी काऊंसिल (GST Council)ची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जीएसटी कंपेनसेशनवर (GST Compensation) चर्चा होणार आहे. याआधी जाणून घ्या कोणत्या गोष्टींवर सरकारनं GST लागू केलेला नाही आहे.

थोड्याच वेळात जीएसटी काऊंसिल (GST Council)ची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जीएसटी कंपेनसेशनवर (GST Compensation) चर्चा होणार आहे. याआधी जाणून घ्या कोणत्या गोष्टींवर सरकारनं GST लागू केलेला नाही आहे.

आमदाराचा मुलगा या जीएसटी घोटाळ्याचा सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 13 नोव्हेंबर : तब्बल 520 कोटी रुपयांच्या GST घोटाळ्यात (GST scam) राज्यातील एका आमदाराचा पूत्र आणि सुनील हायटेकचे व्यवस्थापकीय संचालक (MD) सुनील गुट्टे यांना अटक करण्यात आली आहे. जीएसटी इंटेलिजन्स महानिदेशालयाच्या (DGGI) मुंबई विभागाच्या टीमने या फसवणुकीच्या प्रकरणात गुट्टे यांना अटक केली आहे.

सुनील गुट्टे यांचे वडील महाराष्ट्रात आमदार आहेत. सुनीलसह त्याचे व्यावसायिक सहकारी विजेंद्र रांका यांनाही अटक करण्यात आली आहे. या दोघांना घोटाळ्याचा सूत्रधार मानले जात आहे. जीएसटी इंटेलिजन्स यूनिट देशभरात जीएसटीमधील घोटाळ्याचा शोध घेण्याचं अभियान चालवत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील हायटेक इंजिनिअर्स याने बनावटी बिलांच्या आधारावर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवलं. यासाठी कोणत्याही प्रकारच्या माल वा सेवा दिली गेली नव्हती. याशिवाय आरोपी कंपनीचं टर्नओव्हर वाढवून दाखविण्यात आलं होतं. ही कंपनी बँकांकडून लोन किंवा क्रेडिट लिमिट मिळवित होते.

हे ही वाचा-संजय राऊत किरीट सोमय्यांवर भडकले, दिली जाहीर 'वॉर्निंग'

कुटुंबावर अनेक आरोप

या घोटाळ्याचे मास्टरमाइंड सुनील रत्नाकर गुट्टे यांचे वडील रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) हे महाराष्ट्रातील परभणीतील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सुनील हायटेक या कंपनीत ते संचालकदेखील आहे. त्यांचे भाऊ चित्रपट दिग्दर्शक आहेत. या दिग्दर्शक भावालादेखील 2018 ऑगस्टमध्ये बनावटी जीएसटी रिफंड घेण्याबाबत अटक करण्यात आली होती. सुनीलचे वडील रत्नाकर एक साखर कंपन्याचे मालक आहेत. त्यांच्यावरही 2017 मध्ये महाराष्ट्र पोलीस आणि प्रवर्तन निदेशालयाने 6 बँंकाकडून 328 कोटी रुपयांचा लोन घेताना फसवणूक केल्याची केस दाखल करण्यात आली होती.

त्यांनी परभणी जिल्ह्यात तब्बल 2298 शेतकऱ्यांची नावे देऊन लोन घेतलं होतं आणि महत्त्वाचे म्हणजे यापैकी अनेक शेतकऱ्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे. यादरम्यान मुंबईचे माजी कमिश्नरच्या एन्टी इव्हेजन टीमने मेसर्स ओंकार वेंचर्स प्रायवेज लिमिटेडच्या परिसरात सर्च ऑपरेशन केलं होतं. यामध्ये कंपनीला तब्बल 1.44 कोटी रुपयांचं इनपुट टॅक्स क्रेडिट परत करावे लागले, कारण ते यासाठी सप्लाटर दाखवू शकले नव्हते.

First published:

Tags: GST