मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /12 वीमध्ये 80 टक्के मिळाल्यानंतरही युवकाने केली आत्महत्या, कारण...

12 वीमध्ये 80 टक्के मिळाल्यानंतरही युवकाने केली आत्महत्या, कारण...

बारावीत 80 टक्के गुण मिळवूनही 18 वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे.

बारावीत 80 टक्के गुण मिळवूनही 18 वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे.

बारावीत 80 टक्के गुण मिळवूनही 18 वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे.

बुलडाणा, 17 जुलै : शिक्षणातील स्पर्धा आणि समाजात होत असलेल्या तुलनेमुळे विद्यार्थी दबावात येत असतात. त्यातही निकाल जर 12 वीचा असेल तर विद्यार्थी नेहमीपेक्षा जास्तच दबावात असतात आणि हाच दबाब हाताळण्यात कमी पडल्यास अनेकजण आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतात. बुलडाणा जिल्ह्यातही अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे.

बारावीत 80 टक्के गुण मिळवूनही 18 वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे. विनायक संतोष लांडे असं आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे. आज पहाटे 5 वाजता विनायकने शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. इंग्रजीत कमी मार्क मिळाल्याने मानसिक तणावातून विनायक लांडे याने हे पाऊल उचललं असल्याचं कुटुंब आणि पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

आत्महत्या करणाऱ्या विनायकच्या बहिणीचा सुध्दा काल पॉलिटेक्निकचा निकाल लागला होता. तिला 84 टक्के गुण मिळाले. त्यामुळे आपली तिच्याशी तुलना होऊ शकते, याची भीतीही विनायकला वाटली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा - चॅनल बदलण्यासाठी रिमोटचा केला हट्टा, 7 वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या

दरम्यान, दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातही एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ऐश्वर्या पाटील असं आत्महत्या केलेल्या 20 वर्षीय विद्यार्थिनीचं नाव असून ती कोल्हापूर जिल्ह्यातील वाशी येथील रहिवाशी आहे.

ऐश्वर्या पाटील ही तरुणी बी फार्मसीचा अभ्यास करत होती. मात्र सध्या कॉलेज बंद असल्याने तिने पाच-सहा दिवसांपूर्वी ऑनलाइन अभ्यास सुरू केला होता. मात्र हा अभ्यास समजत नसल्याने ती काही दिवसांपासून नैराश्यात होती. याच नैराश्यातून गुरुवारी रात्री घऱी कोणी नसल्याचे पाहात तिने घरातील फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला.

First published: