थुट्टुकुडी, 17 जुलै: चॅनल बदलायला सांगितल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीची संतापाच्या भरात गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना तमिळनाडू राज्यातील सथंकुलम शहरात घडली.
शेजारी टीव्ही पाहण्यासाठी गेलेल्या 7 वर्षांच्या चिमुकलीला लावलेला चॅनल आवडला नाही. त्यामुळे चॅनल बदलण्यासाठी ती हट्ट करू लागली. चॅनल बदलण्यासाठी रिमोट देण्याची मागणी करू लागली. संतापलेल्या शेजाऱ्यानं चिमुकलीचा गळा दाबून हत्या केली. यापूर्वी अनेकदा या शेजाऱ्याचा चिमुकलीच्या वडिलांसोबत वाद झाला होता. आपण काय केलं हे भानावर येईपर्यंत चिमुकलीनं प्राण सोडले होते.
हे वाचा-बॅट डोक्यात घालून केला पत्नीचा खून, हत्येनंतर स्वत:च पोलिसांना केला फोन आणि...
आरोपीनं गुन्हा लपवण्यासाठी चिमुकलीचा मृतदेह पिंपात लपवून त्यामध्ये कचरा टाकला. आरोपीनं या पिंपाची विल्हेवाट लावली. एका व्यक्तीला हे पिंप दिसल्यानं हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात POSCO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.