मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /दारुड्याचं भयंकर कृत्य! 7 वर्षीय मुलाच्या गळ्यावर ब्लेडने वार, गंभीर जखमी

दारुड्याचं भयंकर कृत्य! 7 वर्षीय मुलाच्या गळ्यावर ब्लेडने वार, गंभीर जखमी

हल्ल्यात सदर मुलगा गंभीर झाला असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हल्ल्यात सदर मुलगा गंभीर झाला असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हल्ल्यात सदर मुलगा गंभीर झाला असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बुलडाणा, 14 जुलै : दारूच्या नशेच दारूड्याने एका निष्पाप मुलावर जीवघेणा हल्ला केला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील जवाई नगर परिसरामध्ये रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली आहे. या हल्ल्यात सदर मुलगा गंभीर झाला असून खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

स्थानिक रहिवासी असलेला हमीद खान सिकंदर खान या ईसमाने दारूच्या नशेत मारूफखान आरिफखांन (वय 7 वर्ष) या बालकाच्या गळ्यावर ब्लेडने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मलकापूर येथील 7 वर्षीय बालक हा गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला स्थानिक नागरिकांनी मलकापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आरोपी हमीद खान सिकंदर खान यास पकडून चांगलाच चोप दिला आहे. तर या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संबंधित आरोपी हमीद खान हा दारूच्या नशेत जवाई नगर परिसरात रस्त्याच्या कडेला पडलेला आढळून आला.

हेही वाचा - 3 अल्पवयीन मुलांनी भररस्त्यात चाकू भोसकून केली एकाची हत्या, CCTVमध्ये रेकॉर्ड झाला थरार

आरोपी हमीद खानला शुद्धीवर आणण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे भरती करण्यात आले व जखमी मुलगा मारूफ़ खान हा गंभीर जखमी झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र या घटनेने काही काळ या परिसरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.

First published: