मुंबई पुण्यानंतर आता औरंगाबाद ठरतंय कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’, 3 दिवसांमध्ये आढळे 75 रुग्ण

मुंबई पुण्यानंतर आता औरंगाबाद ठरतंय कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’, 3 दिवसांमध्ये आढळे 75 रुग्ण

औरंगाबादमध्ये एकूण बाधित रुग्णांची संख्या तब्बल 128 एवढी झाली आहे. नवे रुग्ण सापडत असल्याने शहरातील अनेक भाग सील करण्यात आले आहेत.

  • Share this:

औरंगाबाद 29 एप्रिल: मुंबई आणि पुण्यानंतर आता राज्यात औरंगाबद शहर ‘हॉटस्पॉट’ ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. बुधवारी दुपारपर्यंतच 11 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. तर गेल्या 3 दिवसांमध्ये 75 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या तब्बल 128 एवढी झाली आहे. नवे रुग्ण सापडत असल्याने शहरातील अनेक भाग सील करण्यात आले आहेत.

औरंगाबाद शहरातील सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या 11 रुग्णांपैकी नूर कॉलनीतील आठ रुग्ण आणि भीम नगर, भावसिंगपुरा येथील एक रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता जिल्हा सामान्य रुग्णालयात 105 नवीन कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. घाटी रुग्णालयात 9 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

अशा एकूण 105 नवीन कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. मृत सात आणि बरे होऊन घरी परतणारे 23 असे एकूण 128 कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले आहेत, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

शहरात नव्याने कुणीही आलेलं नसलं तरी जे आधीच बाधित झाले होते त्यांच्याकडूनच कोरोनाचा प्रसार झाला आहे अशी माहितीही डॉक्टरांनी दिली.

हे वाचा -  लॉकडाऊनमुळे देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

राज्यात मंगळवारी कोरोनाबाधित 729 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9318 झाली आहे. दरम्यान, राज्यात आज एकूण 31 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे 25, जळगाव येथील 4 तर पुणे शहरातील 2 आहेत. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता एकूण 400 झाली आहे. त्यात आनंदाची बाब म्हणजे आज 106 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हे वाचा -  धक्कादायक! कम्युनिटी किचनमधले डब्बे रिकामे, 6000 नागरिकांना राहावं लागलं उपाशी

आरोग्य विभागाने दिलेली माहिती अशी की, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1,29,931 नमुन्यांपैकी 1,20,136 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 9318 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

First published: April 29, 2020, 3:39 PM IST

ताज्या बातम्या