Maratha reservation update: आरक्षणाची सुनावणी आता सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या खंडपीठासमोर

Maratha reservation update: आरक्षणाची सुनावणी आता सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या खंडपीठासमोर

सरन्यायाधीश आता मोठं खंडपीठ स्थापन करणार असून त्यातल्या न्यायाधिशांची नावे ठरविण्याचा अधिकारही त्यांना आहे. हे खंडपीठ तयार झालं की त्याच्यापुढे आरक्षणाच्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

  • Share this:

औरंगाबाद 28 ऑक्टोबर: मराठा आरक्षणाची(maratha reservation)  सुनावणी आता सुप्रीम कोर्टाच्या ( supreme court) मोठ्या खंडपीठाकडे होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ गठित करण्यात यावे अशा मागणीचा अर्ज करण्यात आला होता. तो मान्य करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ वकील संदीप देशमुख यांनी दिली, विनोद पाटील यांच्या वतीने त्यांनी बुधवारी सुप्रीम कोटात अर्ज केला होता. कोर्टाच्या रजिस्ट्रीने तो मान्य केल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे एक टप्पा पूर्ण झाल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.

यानंतर सरन्यायाधीश आता मोठं खंडपीठ स्थापन करणार असून त्यातल्या न्यायाधिशांची नावे ठरविण्याचा अधिकारही त्यांना आहे. हे खंडपीठ तयार झालं की त्याच्यापुढे आरक्षणाच्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

अर्ज आज सकाळी सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आला होता. यावर सर्वोच्च न्यायालयातील रजिस्ट्री ने मान्य करून सदरील प्रकरण पाच न्यायमूर्ती कडे पाठवलेला आहे. कॅटेगरी बदलली आहे. मराठा आरक्षणाबाबत एक टप्पा आज पार झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

COVID-19: केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना कोरोनाची लागण, केली ही विनंती

सर्वोच्च न्यायालयाने ( supreme court) मराठा आरक्षण (maratha reservation) प्रकरणाची सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलली होती. त्यामुळे विरोधकांकडून ठाकरे सरकारवर टीका होत आहे. मात्र,  'घटनापीठासमोर सुनावणी व्हावी हीच आमची मागणी होती' असं सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (ashok Chavan) यांनी स्पष्ट केलं.

'मराठा आरक्षणाच्या सुनावणीला स्थगिती देण्यात आली आहे.  घटनापीठासमोर सुनावणी व्हावी हीच आमची मागणी होती. तशा प्रकारचा अर्ज सरन्यायाधीशांकडे आधीच करण्यात आला असून घटनापीठासमोर मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यास सरकार सज्ज आहे', अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली होती.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 28, 2020, 11:14 PM IST

ताज्या बातम्या