मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'कानून के हाथ लंबे होते हैं!' 8 शहरांमध्ये मोटारसायकल चोरणारी अट्टल टोळी पोलिसांच्या जाळ्यात

'कानून के हाथ लंबे होते हैं!' 8 शहरांमध्ये मोटारसायकल चोरणारी अट्टल टोळी पोलिसांच्या जाळ्यात

मोटारसायकल चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींवर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

मोटारसायकल चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींवर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

मोटारसायकल चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींवर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

वीरेंद्रसिंह उत्पात, मंगळवेढा, 30 जानेवारी : सोलापूर,मंगळवेढा, सांगली,मिरज,विजापूर विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटारसायकलची चोरी करणारी टोळी मंगळवेढा पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे. संभाजी हणमंत नलवडे (वय 26), प्रसन्ना उर्फ गोटया प्रकाश कल्ली (वय 22 ) .(दोघे रा.संख ता .जत जि .सांगली) आणि कुमार तानाजी पाटील (रा .बोराळे ता . मंगळवेढा) या तिघांना मंगळवेढा पोलिसांनी अटक केली आहे.

मोटारसायकल चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींवर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 20 दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. त्यांनी चडचण, अथणी,इरकल परिसर आणि शहरातील दुचाकी चोरल्या आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंगळवेढा पोलिसांना दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. दोन इसम मरवडे येथील हॉटेल महाराजासमोर चोरीची बिगर नंबरची हिरो एचएफ डीलक्स मोटर सायकल विक्रीकरिता येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने मंगळवेढा पोलीस ठाणेचे पोसई पुजारी, स.फौ राऊत ,पो.ना सुनिल मोरे, पो.कॉ अनिल दाते हे खाजगी वाहनाने मरवडे येथे जावून थांबले.

माहितीप्रमाणे हॉटेल महाराजा येथे जावून आजुबाजूस लक्ष ठेवण्यात आलं. हुलजंतीकडून येणारे दोन इसम लाल रंगाची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल वरुन हॉटेल महाराजासमोर येवून थांबले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना जागीच पकडले. त्यानंतर त्यांना नाव, पत्ता विचारले असता मोटारसायकल चालविणाऱ्या इसमाने आपले नाव संभाजी हणमंत नलवडे (वय 26 वर्षे रा .संख ता . जत जि . सांगली) आणि पाठीमागे बसलेल्या इसमाने आपले नाव प्रसन्ना उर्फ गोटया प्रकाश कल्ली (वय 22 वर्षे)असल्याचे सांगिते.

जे राजस्थान पोलिसांना जमलं नाही ते कोल्हापूर पोलिसांनी करून दाखवलं, Most Wanted 007 गँगचा केला खेळ खल्लास

या आरोपींना पोलीसांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटारसायकलचे कागदपत्र आणि लायसन्सबाबत विचारपूस केली असता ते उडवाउडवीची आणि असमाधानकारक उत्तरे देऊ लागले. त्यांचा पोलीसांना संशय आल्याने त्यांना अधिक विश्वासात घेवून मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरची मोटारसायकल ही गेल्या 5 - 6 महिन्यापूर्वी मंगळवेढा शहरातील हॉटेल शिवनेरीच्या समोरुन डुप्लीकेट चावीचा वापर करुन चोरलेली असल्याचे सांगितले .

आरोपींच्या कबुलीजबाबानंतर पोसई पुजारी यांनी त्यांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात हजर केले. त्यानंतर पोलिसांनी त्यास मंगळवेढा पोलीस ठाणे गुन्ह्यात अटक केली. या आरोपींचा अधिक तपास केला असता आरोपींनी महाराष्ट्रातील सांगली , मिरज , सोलापूर , मंगळवेढा येथून तसेच कर्नाटक राज्यातील विजापूर , अथणी , इरकल , चडचण या भागातून मोटारसायकल चोरी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

First published:

Tags: Solapur, Solapur news