मंगळवेढा, 8 जून : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विजेच्या धक्क्याने अनेक लोकांचा जीव गेल्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच मंगळवेढा येथील रामकृष्ण ट्रेडर्सचे मालक गोविंद गोपाळ घाडगे यांचे विजेच्या धक्क्याने निधन झाले आहे. मृत गोविंद घाडगे हे 49 वर्षांचे होते.
उद्योजक असलेले गोविंद घाडगे हे सरकारी गोडाऊन पाठीमागे असणार्या त्यांच्या रामकृष्ण ट्रेडर्स या हार्डवेअर दुकानासमोर आलेला माल क्रेनच्या सहाय्याने उतरवून घेत होते. त्यावेळेस क्रेनचा स्पर्श विजेच्या तारांना झाला व याच वेळी घाडगे यांचा चुकून क्रेनला स्पर्श झाला. त्यातच त्यांचे निधन झाले. सुदैवाने या क्रेनच्या स्टेरिंगला प्लास्टिक कव्हर असल्यामुळे क्रेन चालक बचावला मात्र यात गोविंद घाडगे यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर त्यांना जवळच असलेल्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हेही वाचा -भयंकर! मेडिकलला लागलेल्या आगीत डॉक्टरचा होरपळून मृत्यू, एक जण गंभीर जखमी
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. त्यातच आता पावसाळ्यामध्ये अशा घटना वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.