पनवेल, 13 नोव्हेंबर : आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगातही अनेक धक्कादायक घटना समोर येतात. अनेक जण आजही अंधश्रद्धेला बळी पडताना दिसत असतात. अशीच एक धक्कादायक घटना पनवेल तालुक्यातून समोर आली आहे. एका व्यक्तीला साप चावल्यानंतर तो डॉक्टरांकडे न जाता थेट मांत्रिकाकडे गेला. मात्र, या अंधश्रद्धेपायी त्याचा जीव गेला असता. अखेर पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी या व्यक्तीवर योग्य उपचार केल्यानतंर त्याचा जीव जाता जाता वाचला. काय आहे संपूर्ण प्रकरण - नारपोली गावातील नामदेव पदु मढवी वय वर्ष 51 यांना शेतात काम करताना विषारी साप चावल्याची घटना नुकतीच घडली. मात्र, यानंतर ते तत्काळ रुग्णालयात उपचार न घेता एका मांत्रिकाकडे शरीरातील विष उतरवण्यासाठी गेले. मात्र, याठिकाणी त्याचा उलटा परिणाम होऊन त्यांची प्रकृती खालावली. अखेर अत्यावस्थेत त्यांनापनवेल उपजिल्हा रुग्णालयात आणल्यावर त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले आणि अशाप्रकारे मढवी यांचे प्राण वाचले. विशेष म्हणजे मांत्रिकाने डॉक्टरांकडे न जाता घरी जाण्याचा सल्ला दिल्याने जे प्रकरण जीवावर बेतले असते. मात्र, तब्बल सात तासांनी डॉक्टरांकडे आले असतानाही योग्य उपचार करून रुग्णाचे प्राण वाचविले. याबाबत डॉक्टरांनी सर् दंश झाल्यावर मांत्रिकाकडे न जाता तत्काळ सरकारी दवाखान्यात उपचार करावे, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर पांचाळ यांनी केले आहे. हेही वाचा - हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी करा हे 5 नैसर्गिक उपाय स्वप्नात स्वतःचा मृत्यू, साप चावलेला दिसण्याचा अर्थ काय? आपण अनेकदा झोपेत स्वप्ने पाहतो आणि स्वप्न पाहणं हे काही नवीन नाही. प्रत्येकजण झोपेत स्वप्ने अनुभवतो. कधीकधी ही स्वप्ने वाईट असतात, जी आपल्याला झोपेतून जागे करतात तर कधी स्वप्ने इतकी चांगली असतात की ती आपल्याला गाढ झोपेत घेऊन जातात. स्वप्नात आपण अनेकदा अशा गोष्टी पाहतो, जे आपल्या विचारांचे परिणाम असतात, परंतु कधीकधी आपण अशा गोष्टी देखील पाहतो, ज्याचा आपण मनात कधी विचारही केलेला नसतो. अशा अनेक स्वप्नांबद्दल आपल्याला समजत नाही आणि त्यांना काही अर्थही नाही. परंतु जर आपण स्वप्नशास्त्राबद्दल बोलायचे झाल्यास अशी स्वप्ने आपल्याला काही संकेत देतात, परंतु आपल्याला हे संकेत समजत नाहीत. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा स्वप्नांशी संबंधित काही शुभ आणि अशुभ संकेत सांगत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.