मालेगाव, 8 ऑगस्ट: काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असाच काहीसा प्रकार मालेगाव येथे मुंबई- आग्रा महामार्गावर घडला. भरधाव 12 टायरचा मोठा ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या घरात अचानक घुसला आणि एकच हाहाकार उडाला. प्रसंगावधान राखून घरातील सर्व मंडळी तातडीन घराबाहेर पडले म्हणून ते थोडक्यात बचावले.
हेही वाचा..LIVE VIDEO: वडापाव सेंटरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; 5 जण होरपळले, 3 गंभीर
या भीषण अपघातात दादासाहेब पवार यांच्या घराचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच घराच्या अंगणात बांधलेली गायीला ट्रकची जबर धडक बसल्यामुळे ती दगावली आहे. ट्रक घुसला त्यावेळी घरात पवार दाम्पत्य त्यांची मुले व आई होती. मात्र सगळ्यांनी प्रसंगावधान राखून सर्वजण तातडीने घराबाहेर पडले. नशीब बलवत्तर होते म्हणून घरातील सगळ्यांचा जीव वाचला. चालकाचं ट्रक वरून नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. त्यात दादासाहेब पवार यांचं पूर्ण घर उद्ध्वस्त झाल्यामुळे पवार यांचा संसार उघड्याव आला आहे.
काळ आता होता पण... भरधाव ट्रक घुसला घरात, नंतर काय झालं पाहा VIDEO#accidente #Malegaon #Nashik pic.twitter.com/wtTqtOYxg5
— News18Lokmat (@News18lokmat) August 8, 2020
अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारचे नवे नियम
भारतातलं अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नवे नियम केले आहेत. तर काही नियमांमध्ये बदल केले आहेत. रस्ता (Road Safety) सुरक्षेसाठी या गोष्टींचं पालन सगळ्यांनी करावं असं आवाहनही करण्यात आलं आहे. बाईक चालविणाऱ्यांसाठी आणि मागे बसणाऱ्यांसाठी हे नवे नियम असणार आहेत. (New Guidelines for two wheeler)
हेही वाचा...उद्धव ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार, मराठा क्रांती ठोक मोर्चानं केली मोठी तयारी
रस्ते वाहतून मंत्रालयाने केलेल्या नव्या नियमानुसार बाईकवर मागे बसणाऱ्यांसाठी दोन्ही बाजूला हँड होल्डर असणे गरजेचं आहे. सध्या बहुतेक गाड्यांना अशी सुविधा नसते. त्याच बरोबर दोन्ही बाजून फुटरेस्ट असणेही सक्तीचं करण्यात आलं आहे. बाईकच्या मागच्या चाकाचा अर्धा भाग हा कव्हर केलेला असावा. त्यामुळे मागे बसणाऱ्याचे कपडे त्यात जाणार नाहीत. अनेक अपघात याच गोष्टींमुळे होतात.
त्याचबरोबर 3.5 टन वजनाच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम बसविण्याची सूचनाही सरकारने दिली आहे. ही सिस्टिम लावली तर ड्रायव्हरला गाडीच्या हवेची स्थिती योग्य आहे की नाही याची माहिती मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Malegaon