Malegaon corona crisis : कोरोनावर मात केल्यानंतर वृद्धांना घरची ओढ, मात्र कुटुंबीयांनी सोडलं वाऱ्यावर

Malegaon corona crisis : कोरोनावर मात केल्यानंतर वृद्धांना घरची ओढ, मात्र कुटुंबीयांनी सोडलं वाऱ्यावर

corona crisis ज्येष्ठांनी प्रचंड इच्छाशक्तीनं कोरोनावर मात केली. मात्र कुटुंबीयांनी त्यांना घरी नेण्यास टाळाटाळ केल्यानं मालेगावात माणुसकीलाच काळीमा फासला जात आहे.

  • Share this:

मालेगाव, 30 एप्रिल : एकिकडं कोरोनानं (coronavirus) अनेकांचे आई वडील हिरावले आहेत. तर त्याचवेळी कोरोनाचं कारण पुढं करत काही कुटुंबीय वृद्धांची (old people) जबाबदारी झटकत आहेत. मालेगावात (Malegaon) कोरोनावर मात केलेल्या वृद्धांबरोबर (senior cororna patients) असा प्रकार घडल्याचं पाहायला मिळत आहे. सामान्य रुग्णालयात असलेले हे रुग्ण कुटुंबीय कधी आपल्याला घरी नेतील याकडं (corona crisis) नजरा लावून बसले आहेत.

(वाचा-आई-बाबा कसे आहात असं विचारण्यासाठी कुणीच उरलं नाही, चिमुरड्यांवर दु:खाचा डोंगर)

कोरोनाच्या या संकटामध्ये वृद्धांना सर्वाधिक जपण्याची गरज आहे, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना अगदी किरकोळ लक्षणं असतील तरी त्यांना रुग्णालयात दाखल केलं जातं. मात्र बहुतांश ज्येष्ठदेखील सकारात्मक विचारांच्या जोरावर कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरत आहेत. सात ते 14 दिवसांत अनेक ज्येष्ठ रुग्णही घरी जातात. पण मालेगावात काही ज्येष्ठ रुग्ण असे आहेत ज्यांनी कोरोनावर मात केल्यानंतरही ते अद्याप घरी गेलेले नाहीत. त्याचं कारण म्हणजे कुटुंबीय या रुग्णांना घरी न्यायला आलेच नाहीत, किंवा प्रतिसादही देत नाहीत.

(वाचा-पुन्हा Bhilwara Model ची चर्चा! मोठ्या शहरांना जमलं नाही ते या छोट्या शहरात घडलं)

मालेगावच्या सामान्य रुग्णालयात सध्या असे पाच वृद्ध कुटुंबीय न्यायला कधी येमार याकडं नजरा लावून बसले आहे. रुग्णालय प्रशासन या सर्वांना घरी पाठवता यावे यासाठी पोलिसांची मदतही घेत आहे. विशेष म्हणजे या सर्व वृद्धांचं वय हे 65 वर्षांपेक्षा अधिक आहे. रुग्ण बरे झाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कुटुंबियांशी संपर्क साधला. रुग्णाला परत घेऊन जाण्यास सांगूनही कुटुंबीय प्रतिसाद देत नाहीत. रुग्णाला दाखल करताना त्याचा पत्ता आणि इतर माहितीही आधीच घेतली जाते. त्यानुसार काही जणांनी संपर्कही साधला. मात्र तरीही प्रतिसाद मिळत नसल्याचं समोर आलं आहे.

या रुग्णांना घरी नेण्यासाठी कुटुंबीय प्रतिसाद देत नसले तरी आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांची साथ सोडलेली नाही. आरोग्य कर्मचारी त्यांची पूर्ण काळजी घेत आहेत. कोरोना रुग्णांसाठी बेडची संख्या कमी असल्यानं त्यांना इतर वॉर्डात ठेवण्यात आलं आहे. पण त्यांना नाश्ता, जेवण आणि काय हवं नको तेही रुग्णालयाचे कर्मचारी पुरवत आहेत. कोरोनाच्या संकटात काहीही संबंध नसणारे लोकही माणुसकीसाठी सगळ्यांची मदत करत आहेत. मात्र दुसरीकडं रक्ताच्या नात्यांमध्येच असा दुरावा निर्माण झाल्याचंही पाहायला मिळत आहे, हे दुर्दैव.

Published by: News18 Desk
First published: April 30, 2021, 6:16 PM IST

ताज्या बातम्या