सोलापूर, 18 ऑगस्ट : सोलापूर जिल्ह्यात एका शेतकऱ्याला त्याच्याच जनावराने मारल्याची घटना उघडकीस आली आहे. अत्यंत जिवापाड एका शेतकऱ्यांने रेड्याला जपले होते परंतु त्याच रेड्याने त्याचा जीव घेतला आहे. (Solapur) ज्या रेड्यावर शेतकऱ्याने जिवापाड प्रेम केले त्या रेड्यानेच त्या शेतकऱ्याचा जीव घेतल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. धर्मराज पांडुरंग साठे (वय 55) असे त्या रेड्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या बाबत मिळालेली माहितीनुसार, बीबीदारफळ येथील शेतकरी धर्मराज साठे यांनी या रेड्याला मोठ्या कष्टाने जपले होते. म्हैस रेतनासाठी म्हणून त्यांनी हा रेडा पाळला होता. त्यामुळे त्याच्या खुराकासह सर्व ती काळजी ते घ्यायचे. अगदी आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांनी त्याचा सांभाळ केला होता.
हे ही वाचा : चुकीच्या रेल्वेत चढले म्हणून प्लॅटफॉर्म मारली उडी, डोके आणि हात चालले होते रेल्वेखाली, पण...LIVE VIDEO
मागच्या दोन दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे सावळेश्वर रस्त्यावर उसाच्या बाजूला बांधावर ते रेड्याला चारत होते. पण अचानकपणे हा रेडा सैरभैर झाला आणि थेट त्याने साठे यांच्यावरच हल्ला सुरू केला. सुमारे तासभर हा रेडा साठे यांना तुडवत होता. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवाने त्यावेळी त्यांची सुटका करण्यासाठी जवळपास लोकही नव्हते. पण ज्या वेळी लोक आले, तोवर वेळ निघून गेली होती.
लाखाला मागितला, पण प्रेमापोटी विकला नाही
गेल्या महिन्यातच त्याने साठे यांच्यावर हल्ला केला होता. त्याच वेळी काही गावकऱ्यांनी या रेड्याला विकण्याचा सल्ला दिला. अगदी पंधरवड्यापूर्वी एका ग्राहकाने हा रेडा तब्बल एक लाख रुपयांना साठे यांना मागितलाही होता. मात्र साठे यांनी प्रेमापोटी त्याला विकले नाही. पण शेवटी या रेड्यावरील अतिप्रेमच शेतकऱ्यासाठी जीवघेणे ठरले.
हे ही वाचा : Osmanabad : भक्तीत तल्लीन होऊन तुडवलं स्वत:चं मुल!; मंदिरात आजही तरंगतात विटा
भिवंडीत विचीत्र अपघात
मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला भयंकर अपघात झाल्याची घटना भिवंडीमध्ये (bhiwandi) घडली आहे. भिवंडी शहरातील राजीव गांधी उड्डाणपुलावरून (rajiv gandhi bridge bhiwandi) भरधाव वेगात जाणाऱ्या तरुणांची दुचाकी 25 फूट खाली पडून दोन तरुण गंभीर जखमी झाले आहे. जखमी तरुणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भिवंडी शहरातील जकात नाका येथील राजीव गांधी उड्डाणपुलावर ही घटना घडली. सुसाट वेगात आलेल्या दुचाकीची पुलाच्या कठड्याला धडक बसल्याने दोन तरुण पुलावरून थेट 25 फूट खाली पडल्याने गंभीर जखमी झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Solapur, Solapur (City/Town/Village), Solapur City North s13a248, Solapur news, Solapur South s13a251