जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंना वेगळी खूर्ची का? अजितदादांनी सांगितलं

महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंना वेगळी खूर्ची का? अजितदादांनी सांगितलं

महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंना वेगळी खूर्ची

महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंना वेगळी खूर्ची

महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ सभा छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंना विशेष महत्त्व देण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 3 एप्रिल : महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ सभा छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंना विशेष महत्त्व देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ठाकरे महाविकास आघाडीचा मुख्य चेहरा होणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्यात. भाजपविरोधात तयार झालेली महाविकास आघाडीतील तीन पक्ष वेगळे असले तरी तीनही पक्ष समान पातळीवर असतील हे महाविकासआघाडीच्या अजेंड्यावर ठरलंय. मात्र असं असतानाही महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेत ठाकरे गटाचे वर्चस्व पाहायला मिळालं. वज्रमूठ सभेचा मंच पाहिला तर त्यावर तीनही पक्षांच्या नेत्यांचे फोटो होते. मात्र त्यावरील बॅकड्रॉप हा शिवसेना स्टाईलचा होता. सभेच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरेंसाठी स्पेशल खुर्ची ठेवण्यात आली होती. मंचावर उद्धव ठाकरेंचं आगमन होताच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उभे राहून त्यांचं स्वागत केलं. तसंच ठाकरेंची एंट्री आणि भाषणावेळी स्पेशल आतषबाजी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांचं भाषण सर्वात शेवटी आणि जास्त वेळ झालं. ठाकरेंच्या भाषणासाठी अजित पवारांनाही आपलं भाषण आवरतं घ्यावं लागलं. त्यामुळे यापुढे महाविकास आघाडीचा चेहरा आणि नेतृत्त्व हे उद्धव ठाकरे असणार की काय अशा प्रकारची चर्चा सुरु झाली. माजी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचं नेतृत्त्व केलंय. सध्या ठाकरेंबाबत राज्यात सहानुभूतीचं वातावरण आहे. तसंच भाजप आणि शिंदेंविरोधात ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतलीय. याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. त्यामुळेच ठाकरेंना मविआचा चेहरा केल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना वेगळी खूर्ची का ठेवण्यात आली होती, याचं उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांना पाठीचा त्रास असल्यामुळे त्यांच्यासाठी वेगळी खूर्ची ठेवण्यात आल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. ‘उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असताना काही शारिरिक त्रास झाला होता. त्यामुळे पाठीला ताठ असणाऱ्या खूर्चीवर ते बसतात,’ असं अजित पवार म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात