• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • महाराष्ट्रातील तरुणाला धर्मांतर प्रकरणात यूपीत अटक; कोण आहे इरफान, काय आहे बीड कनेक्शन आणि कोडवर्ड?

महाराष्ट्रातील तरुणाला धर्मांतर प्रकरणात यूपीत अटक; कोण आहे इरफान, काय आहे बीड कनेक्शन आणि कोडवर्ड?

Beed youth Irfan Pathan arrest by UP ATS: बीडमधील तरुणाला उत्तरप्रदेशात बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:
बीड, 29 जून: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील इरफान पठाण (Irfan Pathan) नावाच्या तरुणाला उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीर धर्मांतर (Religion conversion) प्रकरणात उत्तरप्रदेश पोलिसांनी एकूण तिघांना अटक केली आहे आणि त्यात इरफानचा समावेश आहे. या प्रकरणामुळे केवळ बीड (Beed)मध्येच नाही तर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणात इरफान याचा खरोखर समावेश आहे की नाही हे अद्याप समोर आलेलं नाहीये. जाणून घेऊयात या इरफान पठाणबाबत सविस्तर. धर्मांतराचे कोडवर्ड मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले तरुण हे विशिष्ट अशा कोडवर्डचे वापर करत होते. एकूण सात कोडवर्डपैकी एटीएसने सहा कोडवर्ड डी कोड केले आहेत. मात्र, अद्याप सातवा कोडवर्ड डी कोड झालेला नाहीये. या प्रकरणात हवाला रॅकेटही असल्याचं वृत्त समोर येत आहे. पंतप्रधानांनीही केले होते कौतुक गुजरातमधील अहमदाबाद येथे आयोजिक करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात इरफान पठाण याने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पंतप्रधानांनी त्याचं कौतुक केलं होतं. इरफानच्या नातेवाईकांनी सांगितले की, व्यासपीठावर सर्वांच्या समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इरफान पठाण याचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या होत्या. या संदर्भातील व्हिडीओ सुद्धा त्याच्या नातेवाईकांनी शेअर केला आहे. कोण आहे इरफान पठाण? इरफान खां पठाणचा जन्म 1986 मध्ये परळीच्या सिरसाळामध्ये झाला प्राथमिक शिक्षण परळीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण वैद्यनाथ महाविध्यालयात झाले बारावीनंतर इरफान मुंबईला शिक्षणासाठी गेला 2013 पासून केंद्र सरकारच्या चाईल्ड वेलफेअरमधील साईन लँग्वेज साठी काम करत होता.. 2015 साली परळीतील मुली सोबत इरफानचे लग्न झाले फेब्रुवारी 2020 मध्ये अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी यांनी इरफान च्या कामाचे कौतुक केले होते आतपर्यंतच्या विविध घटनांतील बीड कनेक्शन 1) जबिनदिन अन्सारी(अबू जिंदाल) बीड शहरांतील रहिवाशी अतिरेकी कनेक्शन जर्मन बेकरी प्रकरण 2) टूल किट प्रकरण शँतनू मुळूक बीड शहरातील रहिवाशी 3) हिमायत बेग, फयाज कागजी जर्मन बेकरी बॉम स्पोट प्रकरण..बीड कनेक्शन 4) औरंगाबाद येथील बेकायदेशीर शस्त्रसाठा प्रकरण बीड कनेक्शन 5) 26 /11 अतिरेकी हल्ल्यात बीड कनेक्शन मध्ये बीड मधील तरुणाचा सहभाग 6)बीड शहरातील अतिरेक्यांशी कनेक्शन असलेले सात ते आठ तरुण अद्याप बेपत्ता आहेत इरफान हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिरसाळा या ठिकाणचा आहे. तो सध्या दिल्ली या ठिकाणी वास्तव्यास आहे. दिल्लीत मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेल्फेअरमध्ये इंटरप्रीटेटर म्हणून काम करतो. मात्र इरफानला अवैध धर्मांतर प्रकरणांमध्ये युपी एटीएसने अटक केली आहे. या संदर्भात शिरसाळा येथील कुटुंबाशी विचारणा केली असता इरफानचा मोठा भाऊ फुरखान खा पठाण याने सांगितलं की, माझा भाऊ इरफान अस काही करणार नाही त्याच्याशी संपर्क झालेला नाही. चार-पाच दिवसापासून त्याच्याशी काहीही बोलणं झालं नाही. तीन-चार महिन्यापूर्वी तो गावाकडे आला होता. विनाकारण त्याला अडकवू नये या प्रकरणातील सत्य काय आहे ते बाहेर आलाच पाहिजे अशी मागणी फुरखान याने केली आहे.
Published by:Sunil Desale
First published: