मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राज्य अनलॉक होणार, 'पाच' टप्प्यातील वर्गीकरण सविस्तर जाणून घ्या

राज्य अनलॉक होणार, 'पाच' टप्प्यातील वर्गीकरण सविस्तर जाणून घ्या

Maharashtra Unlock:कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत.

Maharashtra Unlock:कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत.

Maharashtra Unlock:कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत.

मुंबई, 05 जून: महाराष्ट्र राज्यातील (Maharashtra Unlock) अनलॉकबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्यात होणार आहे. म्हणजेच येत्या सोमवारपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होईल, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आलेत. त्यानुसार त्या त्या जिल्ह्यांमध्ये अनलॉक होईल. (Maharashtra government notification on relaxations to lockdown)

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी अनलॉक (Maharashtra Unlock) संदर्भात घोषणा केली होती. मात्र, काही तासातच राज्य सरकारनं खुलासा करून कोणतीही नियमावली अद्याप निश्चित करण्यात आलेली नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, अखेर शुक्रवारी मध्यरात्री नियमावली जारी करण्यात आली आहे. राज्यात अनलॉकसाठी पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल केले जातील.

खालील प्रमाणे पाच टप्प्यातील वर्गीकरण

पहिला स्तर - पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेड 25% पेक्षा कमी भरलेले आहेत. या टप्प्यात सर्व व्यवहार खुले करण्यात येतील.

दुसरा स्तर - पॉझिटिव्हिटी रेट 5% आणि ऑक्सिजन बेड 25% ते 40% भरलेले आहेत, असे जिल्हे

तिसरा स्तर - पॉझिटिव्हिटी रेट 5% ते 10% आणि ऑक्सिजन बेड 40% हून अधिक भरलेले आहेत. याठिकाणी व्यवहार सायंकाळी ५ वाजता बंद होतील.

चौथा स्तर- पॉझिटिव्हिटी रेट 10% ते 20% आणि ऑक्सिजन बेड 60% असलेले जिल्हे. सायंकाळी ५ नंतर व्यवहार बंद होतील आणि शनिवार, रविवारी व्यवहार बंद असतील.

पाचवा स्तर- पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्याहून अधिक आणि 75% टक्क्याहून अधिक ऑक्सिजन बेड भरलेले जिल्हे

हेही वाचा- सोमवारपासून तुमच्या जिल्ह्यात काय- काय होणार अनलॉक, वाचा सविस्तर

हे आहेत पाच स्तरातील जिल्हे

पहिला स्तर- अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, ठाणे, वर्धा

दुसरा स्तर- औरंगाबाद, गडचिरोली, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी,

तिसरा स्तर- अकोला, अमरावती, बीड, पुणे, वाशिम, यवतमाळ

चौथा स्तर- रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग,

पाचवा स्तर- कोल्हापूर

First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Maharashtra News