जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पॉझिटिव्हीटी रेटनुसार तुमचा जिल्हा कोणत्या स्तरात, जाणून घ्या या आठवड्याची संपूर्ण आकडेवारी

पॉझिटिव्हीटी रेटनुसार तुमचा जिल्हा कोणत्या स्तरात, जाणून घ्या या आठवड्याची संपूर्ण आकडेवारी

पॉझिटिव्हीटी रेटनुसार तुमचा जिल्हा कोणत्या स्तरात, जाणून घ्या या आठवड्याची संपूर्ण आकडेवारी

Maharashtra Unlock: राज्य सरकारनं ‘ब्रेक दि चेन’ (Break The Chain)अंतर्गत लावलेले कोरोना निर्बंध टप्प्याटप्प्यानं उठविण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भातील ताजी आकडेवारी राज्य सरकारनं जाहीर करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 जून: महाराष्ट्र (Maharashtra Unlock) राज्यात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात आली आहे. दिवसेंदिवस राज्यातील नवी कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. राज्य सरकारनं ‘ब्रेक दि चेन’ (Break The Chain)अंतर्गत लावलेले कोरोना निर्बंध टप्प्याटप्प्यानं उठविण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भातील ताजी आकडेवारी राज्य सरकारनं जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक आठवड्याला निकषानुसार यादी जाहीर केली जात आहे. पुढील आठवड्यातील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातील जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पहिल्या गटातील जिल्हे अहमदनगर-3.06 अकोला-4.97 अमरावती -1.97 औरंगाबाद-2.94 भंडारा-0.96 बुलडाणा-2.98 चंद्रपूर-0.62 धुळे-2.42 गडचिरोली-3.53 गोंदिया-0.27 हिंगोली-1.93 जळगाव-0.95 जालना-1.51 लातूर-2.55 मुंबई-3.79 नागपूर-1.25 नांदेड-1.94 नंदूरबार-3.13 नाशिक-4.39 परभणी-0.94 सोलापूर-3.73 ठाणे-4.69 वर्धा-1.12 वाशिम-2.79 यवतमाळ-3.79 पहिल्या गटात नसणारे जिल्हे बीड- 7.11 कोल्हापूर- 13.77 उस्मानाबाद- 5.21 पालघर- 5.18 पुणे- 9.88 रायगड- 12.77 रत्नागिरी- 11.90 सांगली- 8.10 सातारा- 8.91 सिंधुदुर्ग- 9.06 यवतमाळ- 5.24 पहिल्या स्तरातील नियम

  • सर्व प्रकारची दुकानं पूर्ववत सुरु होणार. मॉल, दुकाने, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह नियमितपणे सुरु होणार.
  • लोकल सेवा पूर्ववत होईल. मात्र स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला निर्बंध घालण्याची मुभा असेल.
  • जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी, सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली होतील.
  • सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत होईल, जमावबंदी नसेल.
  • खासगी कार्यालये सुरु होती, तर शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरु होतील.
  • विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल.
  • लग्नसोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतीही बंधनं नसतील, या भागात जमावबंदी नसेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात