मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, 386 मुले कोरोनाबाधित

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, 386 मुले कोरोनाबाधित

 कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (corona third wave) लहान मुलांना कोरोनाची सर्वाधिक बाधा होईल अशी भीती वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (corona third wave) लहान मुलांना कोरोनाची सर्वाधिक बाधा होईल अशी भीती वर्तवली जात आहे.

Maharashtra Third Wave: तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका हा लहान मुलांना होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यातच आता मोठी बातमी समोर येत आहे.

रत्नागिरी, 03 जुलै: राज्यात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येत आहे. मात्र डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र राज्यात आहे. त्यामुळे राज्याला तिसऱ्या (Third Wave) लाटेचा धोका असल्याचं वर्तवण्यात आलं आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्णही रत्नागिरी जिल्ह्यात आहे. तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका हा लहान मुलांना होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यातच आता मोठी माहिती समोर येत आहे की, रत्नागिरी (Ratnagiri District) जिल्ह्यात 386 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 14 वर्षाखालील वयोगटातील 386 मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना बाधितांचे प्रमाण 6.96 टक्के इतकं आहे. बाधित मुलांमध्ये कोणतीही लक्षण नसून केवळ ट्रेंसिगमध्ये किंवा संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही जिल्ह्याची आकडेवारी या महिन्यातली आहे.  खेड तालुक्यात 226 मुलांना या महिन्यात कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये सद्यस्थितीत 40 ऍक्टिव्ह आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही चिंतेची बाब आहे.

सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत घरातील मोठ्यांबरोबर लहान मुलांची देखील तपासणी केली जात आहे. त्यामुळे लहान बालकेही यात कोरोनाबाधित म्हणून दाखल करण्यात आली आहेत.

हेही वाचा- लसीचे दोन्ही डोस घेतल्यानं मृत्यूचा धोका नाही?, केंद्र सरकारनं दिली मोठी माहिती

एकट्या खेड तालुक्यात 14 वर्षांखालील 27 मुले कोरोनाबाधित असून त्यातील 6 मुले ही गृह विलगीकरणात आहेत. तर 21 मुलं विविध ठिकाणी दवाखान्यात उपचार घेत आहेत. यात धक्कादायक बाब म्हणजे अगदी 6 वर्षापासून ते 14 वर्षांपर्यंतची मुलं कोरोनाबाधित झाली आहेत.

खेड तालुक्यातील 27 मुलांपैकी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बाधित मुले खाली देण्यात आलेल्या ठिकाणी उपचार घेत आहेत.

आंबवली -2

मुरुड- 3

खेड नगर परिषद- 3

कोरेगाव- 8

लोटे- 1

शिवबुद्रुक- 4

तिसंगी- 2

वावे- 4

अशी 21 असून यातील 6 मुले घरी उपचार घेत आहेत. या मुलांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसली तरी त्यांची तपासणी केल्यावर ही मुलं बाधित निघाली आहेत. जिल्ह्यात 2 तारखेपर्यंत एकूण पॉझिटिव्ह केसेस 62 हजार 880 झाल्या आहेत.

First published:

Tags: Coronavirus, Maharashtra, Ratnagiri